म्हापसा : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री तथा बहुजन समाजाचे नेते भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव नियोजित मोपा विमानतळाला देण्याची मागणी मगोप नेते भाई मोये यांनी केली. म्हापसा येथील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
म्हापसा येथील मारुती मंदिराजवळील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याला ज्येष्ठ मगोप (MGP) कार्यकर्ते प्रकाश वेर्णेकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. नाटेकर म्हणाले, भाऊसाहेब बांदोडकर (Bhausaheb Bandodkar) हे गोव्याचे महान नेते होते. गोव्याचा शैक्षणिक विकास भाऊसाहेबांच्या काळातच झाला. त्यांच्यामुळेच विकासगंगा गोमंतभूमीत अवतरली होती व त्यामुळे गोमंतकीय समाज आज सुशिक्षित झाला आहे. म्हणूनच त्यांचे कार्य आम्ही कायम स्मरणात ठेवणे आवश्यक आहे. श्रीपाद येंडे यांनी आभार मानले.
भाऊसाहेब बांदोडकर यांना अभिवादन
गोमंतक मराठा समाजाच्या म्हापसा (Mapusa) विभागातर्फे गणेश पार्सेकर यांच्या हस्ते भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली. यावेळी त्या ज्ञातिसंस्थेचे कार्यकर्ते दुर्गेश वेरेकर, प्रसाद पार्सेकर व शरयू कोलवाळकर उपस्थित होते. तसेच त्यानंतर आमदार जोशुआ डिसोझा, नगराध्यक्ष शुभांगी वायंगकर व म्हापसा पालिकेच्या इतर नगरसेवकांनी भाऊसाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.