Mopa International Airport | PM Modi and Pramod Sawant | Manohar Parrikar  Dainik Gomantak
गोवा

Mopa International Airport: 'मनोहर' नव्हे 'मनोहर पर्रीकर' असे विमानतळाला नाव द्या; गोव्यातील भाजप नेत्याची मागणी

नाव दुरूस्त करण्याची गोव्यातील भाजप नेत्याची मागणी

Pramod Yadav

Mopa Airport: गोव्यात मोपा येथे नव्याने सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याच वेळी या विमानतळाचे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. मोपा येथील विमानतळाला 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नाव देण्यात आले आहे. खुद्द नरेंद्र मोदी यांनी या अधिकृत नावाची रविवारी घोषणा केली. दरम्यान हे नाव दुरूस्त करावे अशी मागणी गोव्यातील एका भाजप नेत्याने केली आहे.

गोवा भाजपचे प्रवक्ते सॅवियो रॉड्रिग्ज (Savio Rodrigues) यांनी याबाबत मागणी करणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध केला आहे.

"मोपा येथील विमानतळाला गोव्याचे आणि देशाचे नेते मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. ही अभिमानाची बाब आहे. पण, मनोहर पर्रीकर हे एकनिष्ठ आणि प्रगतीसाठी समर्पितपणे काम करणारे आदरणीय व्यक्ती होते. त्यांची देशात व जगात मनोहर पर्रीकर अशी ओळख आहे. त्यामुळे मोपा विमानतळाला दिलेले "मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ" नाव दुरूस्त करून "मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळ" असे देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विनंती केली आहे.

दरम्यान, यापूर्वी मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला काय नाव दिले जावे यावरून मोठा वाद झाला होता. मगो पक्षाने मोपाचे नामकरण गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर असे करावे अशी मागणी केली होती. तर, काही जणांनी डॉ. जॅक सिक्वेरा यांचे नाव देण्याची मागणी केली होती. तसेच, भाजपने मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. अखेर राज्य सरकारने मनोहर पर्रीकर यांचा नावाचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची रविवारी अधिकृत घोषणा केली.

पण, केवळ 'मनोहर' एवढेच नाव दिल्याने ते दुरूस्त करून 'मनोहर पर्रीकर' असे नाव देण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT