environmental impact of Mopa airport Goa Diniak Gomntak
गोवा

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Mopa Airport Goa : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासामुळे कासारवर्णे गावातील ग्रामस्थांचे जीवन धोक्यात आले आहे, असा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोरजी : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासामुळे कासारवर्णे गावातील ग्रामस्थांचे जीवन धोक्यात आले आहे, असा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, या गावासमोर मोठे संकट उभे राहत असल्याचे चित्र आहे.

विमानतळ परिसरातून येणारे पावसाचे प्रचंड पाणी डोंगर उतारातून थेट शेतात आणि रस्त्यावर येत असल्याने गावात पूरस्थिती उद्‍भवते. या पाण्यासोबत माती, दगड आणि लाकडांचा मोठा साठा शेतांत जमा होतो. परिणामी शेतीचे मोठे नुकसान होत असून, रस्ते तासंतास पाण्याखाली जात असल्याने वाहतूकही पूर्णपणे ठप्प होते.

अनेकदा वाहनचालक आणि शेतकरी जीव धोक्यात घालून या पाण्यातून मार्ग काढताना दिसतात. ‘मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.याशिवाय, बाळा बारजवळील अरुंद पूल, चांदेल प्लांटची पाइपलाईन आणि वाढलेली झाडं पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करत असल्याने रस्त्यावर पाणी तुंबते आणि स्थिती अधिकच गंभीर बनते.

मुख्यमंत्र्यांनीच उपाययोजना करावी!

विकासाच्या नावाखाली मोठमोठी आश्वासने दिली जात असताना प्रत्यक्षात मात्र लोकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. सध्या गावातील नागरिकांना दररोज पाण्याने भरलेल्या रस्त्यांमधून जीव मुठीत धरून येजा करावी लागत आहे. स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी कासारवर्णेकरांची ठाम मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT