Manohar International Airport
Manohar International Airport Dainik Gomantak
गोवा

Manohar International Airport : ‘मोपा विमानतळाला अजूनही ‘न्यू गोवा एअरपोर्ट’चेच नाव ! ‘मनोहर’चा विसर

दैनिक गोमन्तक डिजिटल

पेडणे तालुक्यातील नवीन मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नामकरण केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी उद्‍घाटनावेळी केली होती. त्यानंतर बुधवारी ४ जानेवारी २३ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या नावाला अधिकृत मान्यता देण्यात आली.

परंतु ‘जीएमआर’ कंपनीला ‘मनोहर’ नावाचा विसर पडला असून ‘न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट’ नावाचेच फलक अजूनही रस्तोरस्ती झळकत आहेत.

नागरी उड्डाण मंत्री, गोवा राज्य प्राधिकरण, मुख्य सचिव, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि राज्यपाल यांच्याकडे या प्रकरणी स्थानिक पत्रकार ज्ञानेश्वर वरक यांनी ईमेल द्वारे तक्रार केली आहे. वरक यांनी या तक्रारीत म्हटले आहे, की जीएमआरने कराराचे उल्लंघन केले आहे.

‘जीएमआर’ कडून कराराचे उल्लंघन !

करारातील मुद्दा क्र. ५ प्रमाणे विमानतळ किंवा त्‍याच्‍या कोणत्याही भागाला जीएमआर किंवा त्‍याच्‍या भागधारकांचे नाव किंवा ओळख जाहिरात करण्‍यासाठी, प्रदर्शित करण्‍यासाठी किंवा परावर्तित करण्‍यासाठी कोणत्याही प्रकारे ब्रॅण्डिंग केले जाणार नाही.

स्वतःच्या नावाचा प्रचार करण्यासाठी विमानतळाचा वापर केला जाणार नसल्याचे करारात नमूद करण्यात आले आहे. प्रवाशांच्या माहितीसाठी किंवा इतर संबंधित कारणासाठी विमानतळावरील सूचना फलकाचा वापर ‘जीएमआर’ कडून केला जाईल. संबंधित सरकारी प्राधिकरणाने जाहीर केलेल्या नावाचाच जीएमआर वापर करणार आहे.

"एका खाजगी कंपनीकडून सरकारशी केलल्या कराराचे उल्लंघन होत आहे. एक जागरूक नागरिक आणि पत्रकार या नात्याने 24 फेब्रुवारी रोजी सदर पत्र ई-मेलद्वारे ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे काम आपण केले."

"परंतु सरकारकडून याची कोणतीच दखल घेतली जात नाही,ही खंत आहे. माजी केंद्रीय मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा मान राखण्यासाठी जीएमआर कंपनीला धाक दाखवणे गरजेचे आहे."

- ज्ञानेश्‍वर वरक, पत्रकार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

SCROLL FOR NEXT