GMR taxi rule Goa Dainik Gomatnak
गोवा

Mopa Taxi Protest: मोपावरचे जाचक धोरण! टॅक्‍सीचालकांची मुख्‍यमंत्र्यांच्‍या निवासस्‍थानी धडक; CM सावंतांची शिष्टमंडळाशी चर्चा

Mopa Airport Taxi Protest: मोपा विमानतळावर दोन मिनिटांपेक्षा जास्‍त वेळ टॅक्‍सी थांबली तर तिला २१० रुपये दर आकारण्‍याचा नियम ‘जीएमआर’ कंपनीने केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मोपा विमानतळावर दोन मिनिटांपेक्षा जास्‍त वेळ टॅक्‍सी थांबली तर तिला २१० रुपये दर आकारण्‍याचा नियम ‘जीएमआर’ कंपनीने केला होता. या नियमाचा स्‍थानिक टॅक्‍सीचालकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत होता. त्‍यामुळेच टॅक्‍सी संघटनांनी सायंकाळी मुख्‍यमंत्र्यांच्‍या शासकीय निवासस्‍थानी धडक देत त्‍यांच्‍याशी चर्चेची मागणी केली.

मोठ्या संख्‍येने टॅक्‍सीचालक मुख्‍यमंत्र्यांच्‍या शासकीय निवासस्‍थानी येत असल्‍याची माहिती मिळताच पोलिसांनी कडक बंदोबस्‍त ठेवला. अखेर मुख्‍यमंत्र्यांनी टॅक्‍सीचालकांच्‍या शिष्‍टमंडळाला चर्चेसाठी बोलावल्‍यानंतर त्‍यांच्‍यातील संतापाची लाट ओसरली.

मोपा विमानतळाच्‍या ‘ड्रॉप झोन’मध्‍ये थांबण्‍यास टॅक्‍सींना केवळ दोन मिनिटांचा वेळ देण्‍यात आला होता. गरोदर महिला, ज्‍येष्‍ठ नागरिक, दिव्‍यांग तसेच लहान मुले टॅक्‍सीत असतील, तर त्‍यांना दोन मिनिटांच्‍या काळात टॅक्‍सीतून उतरवणे शक्‍य नसते. हे माहीत असतानाही ‘जीएमआर’ने केवळ आमची आर्थिक लुबाडणूक करण्‍यासाठी दोन मिनिटांपेक्षा अधिक वेळ झाल्‍यास २१० रुपये घेण्‍याचा निर्णय घेतला होता.

याची संपूर्ण माहिती आम्‍ही बैठकीत मुख्‍यमंत्र्यांना दिली. त्‍यावर त्‍यांनी याबाबत आपण ‘जीएमआर’च्‍या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ. तोपर्यंत हा वेळ पाच मिनिटे इतका राहील, अशी हमी त्‍यांनी आम्‍हाला दिलेली आहे, अशी माहिती टॅक्‍सी संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्‍यान, मोपावरील ‘ड्रॉप झोन’कडे जाण्‍यासाठीच्‍या मार्गावर याआधी एकच स्‍पीडब्रेकर होता.

परंतु, आम्‍ही दोन मिनिटांत ग्राहकांना उतरून जाऊ शकतो हे कळाल्‍यानंतर ‘जीएमआर’ने जाणीवपूर्वक तेथे तीन स्‍पीडब्रेकर उभारले. याची माहिती आम्‍ही मुख्‍यमंत्र्यांना दिल्‍यानंतर त्‍यांनी मोपा विमानतळ पोलिस स्‍थानकाच्‍या निरीक्षकांना या स्‍पीडब्रेकरची पाहणी करण्‍याचे आणि ते योग्‍य नसतील तर हटवण्‍याचे निर्देश दिलेले आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

SCROLL FOR NEXT