Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : ‘मोपा’ सुरु झाल्यावर ‘दाबोळी’वर काय होणार परिणाम?

टॅक्सीचालकही चिंतेत; दक्षिणेत हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport : बहुप्रतिक्षित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 रोजी होत आहे. जसे हा विमानतळ जन्माला आला, तेव्हापासून अनेक प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. मोपा विमानतळ अस्तित्वात आल्यावरही ‘दाबोळी’ सुरूच राहणार, असे आश्वासन सरकारने वारंवार दिले असले तरी दक्षिण गोव्यातील हॉटेलचालक आणि टॅक्सी व्यावसायिकांचा यावर अजूनही विश्वास बसत नाही. मोपा सुरू झाल्यावर दाबोळीचे अस्तित्व 4 ते 5 वर्षेच, अशा प्रतिक्रिया व्यावसायिकांकडून ऐकू येत आहेत.

दक्षिण गोव्यातील पर्यटनाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी या विमानतळाचा मोलाचा वाटा आहे. दुसरीकडे मोपा विमानतळ उत्तर गोव्यासाठी भविष्यात वरदान ठरणार आहे. बहुतेक पर्यटनस्थळे उत्तरेत असल्याने प्रवाशांना ‘दाबोळी’वर उतरून उत्तरेकडे यावे लागायचे. मात्र, आता पर्यटकांना थेट उत्तरेत प्रवेश करता येणे शक्य आहे. हे जरी सकारात्मक चित्र असले, तरी येथील बहुतांश प्रकल्पग्रस्तांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. लिंक रोडसाठी लोक अजूनही आंदोलन करत आहेत.

दाबोळी विमानतळ हा दक्षिण गोव्यातील आदरातिथ्य व्यवसायाचा कणा असून एकूण ६ हजार टॅक्सीचालक आणि सुमारे 1 हजार हॉटेल व्यावसायिकांचे भवितव्य थेट या विमानतळाशी जोडले गेले आहे. दक्षिण गोव्यातील पर्यटनाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी या विमानतळाचा वाटा मोलाचा ठरला आहे. मात्र, ज्या दिवशी मोपा विमानतळ सुरू होईल, तो दिवस दक्षिण गोव्यातील आदरातिथ्य व्यवसायाच्या शवपेटीवरील शेवटचा खिळा ठरेल, अशी भीती दक्षिण गोव्यातील हॉटेलमालक आणि लहान व मध्यम हॉटेलमालक संघटनेचे माजी अध्यक्ष सेराफिन कोता यांनी व्यक्त केली.

उपलब्ध आकडेवारीनुसार कोविडचा फटका बसूनसुद्धा एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत या विमानतळाने 51.33 लाख प्रवाशांना हाताळले. तर 39 हजार विमानांचे त्यावर दळणवळण झाले. या विमानतळाची एकूण क्षमता 1 कोटी प्रवासी हाताळण्याची असून आतापर्यंत 8.36 लाख प्रवाशांचा टप्पा त्याने गाठला आहे.

मोपा सुरू झाल्यानंतर दाबोळी बंद होणार हा मुद्दा आता पुन्हा एकदा वर आला आहे. त्याचे कारण म्हणजे विमानतळ पसंत करण्याची विमान कंपन्यांना दिलेली सवलत, हे असल्याचे सांगितले जाते. दाबोळी विमानतळ नौदलाकडे असल्याने तो सकाळच्या वेळी बंद असतो. याउलट मोपा 24 तास खुला राहाणार असल्याने बहुतेक विमान कंपन्या मोपालाच प्राधान्य देतील. याशिवाय दोन्ही विमानतळांवर वेगवेगळे कर्मचारी ठेवणे विमान कंपन्यांनाही परवडणार नाही. त्यामुळे विमान कंपन्या एकाच विमानतळाला प्राधान्य देतील आणि निश्चितच हे प्राधान्य मोपा विमानतळाला असेल , असे मत कोता यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरने दुखापतीबद्दल दिली मोठी अपडेट, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Goa Live Updates: रेल्वेच्या धडकेने मये येथे रेडा ठार

Horoscope: सुवर्णयोग! वृषभ, मिथुनसह 5 राशींना प्रचंड आर्थिक लाभ आणि यश; मेष आणि कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टी टाळा

Goa Rain: हातातोंडाशी आलेला घास मातीमोल, 'पर्जन्यराजा' अवेळी कोपला; शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट

Mardol Mobile Tower: म्हार्दोळच्‍या क्रीडा मैदानावरील मोबाईल टॉवरचे काम तूर्त बंद, स्थानिकांचा विरोध; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

SCROLL FOR NEXT