Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: राज्यात मॉन्सून जोर पकडणार, वेधशाळेचा अंदाज

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon Update राज्यात मॉन्सून दाखल झाला हाेता, मात्र, त्याला बळकटी मिळाली नाही. आता पूरक परिस्थिती निर्माण होत असल्याने राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे.

राज्यात सोमवारी आणि मंगळवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्हीही जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ जारी केला असल्याचे गोवा वेधशाळेने कळविले आहे.

या दिवसांत राज्यात ताशी 45 ते 50 किमी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 21 ते 22 जूनदरम्यान मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे.

24 तासांत 48.7 मिमी पाऊस

यंदाचा मॉन्सून सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद गेल्या २४ तासांत झाली असून राज्यात आज ४८.७ मिमी म्हणजे सुमारे २ इंच पावसाची नोंद झाली. यामधील सर्वाधिक पाऊस मडगावात झाला असून त्याखालोखाल, केपे, सांगे, पेडणे, म्हापसा आदी भागांत पाऊस पडल्याची नोंद गोवा वेधशाळेने केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

SCROLL FOR NEXT