The monsoon will arrive in Goa from June 5 to 7
The monsoon will arrive in Goa from June 5 to 7 
गोवा

गोव्यात 5 ते 7 जूनपर्यंत मान्सून दाखल

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: नेहमीप्रमाणे 5 ते 7 जूनपर्यंत मान्सून(monsoon) गोव्यात(Goa) दाखल होईल, असा अंदाज आहे. पण, तौक्ते चक्रीवादळामुळे(Cyclone Tauktae) निश्चित तारीख सांगणे अवघड झाल्याचे हवामान खात्याचे शास्त्रज्ञ एम. राहूल यांनी सांगितले आहे. याशिवाय येत्या रविवारपर्यंत पावसाचा शिडकावा होत राहील, असेही ते म्हणाले. तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात अनपेक्षित बदल झाले आहेत. विशेषतः राज्यभरात अवकाळी पावसामुळे नागरिक त्रस्त आहेत. अद्यापही वादळाचा प्रभाव ओसरलेला नाही. त्यात केरळला 31 मे रोजी मान्सून पोहचणार हे निश्चित झाले आहे, त्याचाही हा परिणाम असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. दरवर्षी केरळला मान्सून पोहचल्यानंतर चार ते पाच दिवसात मान्सून गोव्यात पोहचतो. यावेळीही तो त्याच काळात पोहचेल, पण निश्चित तारीख सांगता येत नाही. वादळामुळे हवामानात अनपेक्षित बदल झाले आहेत. त्याचा हा परीणाम आहे. कांही दिवस राज्याच्या विविध भागात पावसाचा शिडकावा होत राहणार आहे. (The monsoon will arrive in Goa from June 5 to 7)

पुढील काही दिवस हवामानात बदल शक्य

आज गुरूवारपासून ते रविवारपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाचा शिडकावा होणार आहे. त्याशिवाय तापमानातही बदल होणार आहे. आज राज्याचे तापमान 31,21 अंश सेल्सीयस, 22  तारखेला 30अंश तर 23 तारखेला 29अंश सेल्सीयस असे तापमान असणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. 1 जानेवारी 2021 पासून आतापर्यंत राज्यात362.1 मिमि पावसाची नोंद झाली आहे. त्यातील सर्वाधिक पाऊस (302.5 मिमि) गेल्या सहा दिवसात झाला आहे. 

बंगालच्या वादळाचा परिणाम 

येत्या 25 मे रोजी बंगालच्या महासागरात वादळाची शक्यता आहे. या वादळाचा फटका बंगाल आणि ओडिसाला अधिक प्रमाणात बसणार आहे. परंतू, हे वादळ अरबी समुद्राच्या किनार पट्टीवर परीणीम करू शकणार नाही, असे एम. राहुल यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT