Goa Monsoon 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

Goa Monsoon 2024: यंदा मॉन्सून दाखल होत असताना कोणतेही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात निर्माण झालेले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon 2024

नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या (Monsoon) प्रगतीसाठी सध्या हवामानातील आवश्यक घटक पूरक आहेत. त्यामुळे यंदाच्या मॉन्सूनची प्रगती वेगाने सुरू असून गोव्यात पाच जूनला हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सून रविवारी (ता.19) दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने यापूर्वी वर्तविली आहे. मॉन्सूनचे देशातील महाद्वार असलेल्या केरळमध्ये मॉन्सून 31 मे रोजी दाखल होणार असल्याचेही विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता राज्यात मॉन्सून कधी बरसेल याची उत्सुकता वाढली आहे.

मॉन्सूनच्या उत्तरेकडे होणाऱ्या प्रगतीच्या सरासरी तारखा ठरल्या आहेत. त्यानुसार गोव्यात पाच जूनला दाखल होऊन उत्तरेकडे वाटचाल करत सहा जूनला तळकोकणात मॉन्सून पोचेल. यंदा मॉन्सून दाखल होत असताना कोणतेही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात निर्माण झालेले नाही.

सांख्यिकी प्रारूपाचा वापर

2005 पासून मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची तारीख भारतीय हवामान विभाग जाहीर करत आहे. त्यासाठी सांख्यिकी पद्धतीचे प्रारूप देशात विकसित केले आहे. त्या आधारावर चार दिवस पुढे-मागे मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल, असे नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: शेकडो कोटी खर्च केले, पण समस्या कायम! गोव्यात विकास होतोय की विकासाचा अतिरेक?

Goa Land Scam: भविष्यात गोव्यातील लोकांकडे 'पैसा' असेल, पण स्वत:ची 'जमीन' व 'गोंयकारपण' असणार नाही..

Sanguem: सांगेत समस्यांचा पाऊस! मार्केट, स्टॅन्ड परिसरात असुविधा; वाचा Ground Report

Kadamba Smart Pass: रांगेत उभं राहण्याची झंझट संपली, कदंब प्रवाशांसाठी स्मार्ट ट्रान्झिट पास व कार्डची सोय; पासधारकांना 50% सवलत

Goa Rice Farming: गोव्यात तांदूळ उत्पादन वाढले! आधुनिक पद्धतीने भातशेती करण्यावर भर; उत्पादन क्षेत्रात मात्र घट

SCROLL FOR NEXT