Fishing Ban In Goa: गोव्यात एक जूनपासून 61 दिवस मासेमारीला बंदी

Fishing Ban In Goa: गोवा सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1980 (1981 चा कायदा क्रमांक 3) च्या कलम 4 च्या उपकलम (1) आणि (2) अंतर्गत याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे.
Fishing Ban In Goa
Fishing Ban In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Fishing Ban In Goa

गोव्यात दरवर्षी लागू होणारी मासेमारी बंदी येत्या एक जूनपासून सुरु होणार आहे. 1 जून ते 31 जुलै या काळात ही बंदी असेल. 61 दिवसांच्या या कालावधीत यांत्रिक मासेमारीवर बंदी असणार आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

मत्स्य व्यवसाय विभागाच्या माहितीनुसार, 61 दिवसांच्या बंदी कालावधीत यांत्रिक साधने बसवलेल्या जहाजांद्वारे मासेमारी आणि ट्रॉल-नेट आणि पर्स-सीन नेटद्वारे मासेमारी करण्यास मनाई असेल.

दरम्यान, 10 HP पर्यंत क्षमतेच्या आऊटबोर्ड किंवा इनबोर्ड मोटर्सने सुसज्ज असलेल्या नोंदणीकृत मोटार कॅनोला यातून सूट देण्यात आली आहे. मात्र, त्यांना मासेमारीसाठी गिल जाळी वापरणे बंधनकारक असेल. मत्स्यव्यवसाय संचालक डॉ. शमिला मॉन्टेरो यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

Fishing Ban In Goa
Margao Fatal Accident: अपघातानंतर दोघेही अर्धातास वाहनात अडकून पडले, एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी

गोव्यातील किनारपट्टीवर माशांच्या प्रजननासाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने दरवर्षी राज्यात 61 दिवसांसाठी मासेमारीवर बंदी घातली जाते. तसेच, मासळीचे संवर्धन करण्यासाठी यांत्रिक साधनांनी मासेमारीस मनाई केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com