Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

मॉन्सूनचा प्रथमच कारवारमध्ये मोठा मुक्काम

10 दिवस रेंगाळला : कमजोर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परिणाम; अचूक अंदाजाचा अभाव

दैनिक गोमन्तक

पणजी : यंदा प्रथमच मॉन्सूनने सर्वाधिक काळ 10 दिवस कारवारमध्ये मुक्काम ठोकला आहे. यामागे कमजोर मोसमी वारे, मॉन्सून जाहीर करण्यासाठीची भारतीय हवामान खात्याची घाई आणि अचूक अंदाजाचा अभाव असल्याची चर्चा आहे.

हवामान खात्याचे अंदाज चुकणे यात नवीन काही नाही. त्यामुळे हवामान खाते नेहमीच चेष्टेचा विषय असतो. यंदा मान्सूनच्या बाबत हवामान खाते सपशेल चुकले.

जागतिक हवामानाविषयी माहिती देणाऱ्या खासगी स्कायमेट संस्थेने मॉन्सून केरळमध्ये सुद्धा दाखल झाला नाही असे सांगत असतानाच भारतीय हवामान खात्याने मॉन्सूनला कारवारपर्यंत ॲडव्हान्स केले.

पुढील 2 ते 3 दिवस मॉन्सूनची शक्यता नाही. त्यामुळे मॉन्सून दहा दिवस कारवारमध्येच मुक्कामाला आहे. हे सर्व कमजोर दक्षिण पश्‍चिम अर्थात नैऋत्य मोसमी वाऱ्याचा परिणाम असल्याचे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे निवृत्त वैज्ञानिक डॉ. एम रामेशकुमार यांन सांगितले. मॉन्सून अर्थात मोसमी वारे ॲडव्हान्स करण्यासाठी अनेक बाबींची आवश्यकता असते. प्रामुख्याने नैऋत्य वाऱ्याचा वेग, समुद्रावरून येणारी आर्द्रता, ढगांची उंची, घनता आणि किमान पावसाचे हजेरी हे असते.

स्कायमेटचा अंदाज खरा ठरला

यंदा बंगालच्या उपसागरात व अंदमान निकोबारमध्ये तब्बल सात दिवस मॉन्सून अगोदर दाखल झाला. त्या अंदाजानुसार केरळमध्ये 1 जून ऐवजी 27 मे रोजी हवामान खात्याने मॉन्सून सक्रिय झाल्याचे जाहीर केले आणि 31 मेला मान्सून कारवारपर्यंत ॲडव्हान्स केला. मात्र, मॉन्सून सक्रिय राहण्यासाठीची स्थिती अरबी समुद्रात नसल्याचे म्हणत स्कायमेटने भारतीय हवामान खात्याच्या अंदाजवर आक्षेप घेतला आणि तो बरोबर ठरला.

मुक्कामात भर पडणार

अलीकडच्या काळात 2016 मध्ये मॉन्सूनने कारवारमध्ये 10 ते 18 जून असा 8 दिवसांचा मुक्काम ठोकल्याची नोंद आहे. यंदा या मुक्कामात भर पडणार असून तो मुक्काम दहा दिवसांचा असण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2013 मध्ये मॉन्सूनने केवळ 16 दिवसात देश व्यापला होता. तर 2002 मध्ये देशभर पसरण्यासाठी 75 दिवस घेतले होते असे डॉ.रमेश कुमार म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT