Monsoon update in Goa Dainik Gomantak
गोवा

Monsoon Withdrawal : लवकर आला लवकर परतला; ‘मे’ महिन्यात सुरु झालेल्या मॉन्सूनने गोव्यातून घेतला निरोप

Monsoon Withdrew from Goa: गोव्यात ३० सप्टेंबर आणि १० ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाची नोंद झाली. या दोन दिवसांच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

Pramod Yadav

पणजी: नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला चांगलाच वेग आला आहे. देशातील काही भागांबरोबरच गोव्यातून मॉन्सूने माघार घेतल्याचे हवामान विभागाने सोमवारी (१३ ऑक्टोबर) जाहीर केले. परतीसाठी पोषक हवामान असल्याने लवकरच मॉन्सून देशातून निरोप घेण्याची शक्यता आहे. यावर्षी नेहमीपेक्षा लवकर आगमण झालेल्या पावसाने निरोप देखील लवकर घेतला आहे.

यावर्षी गोव्यात २५ मे रोजी पावसाचे आगमण झाले होते. नेहमीपेक्षा ११ दिवस अगोदर पावसाने हजेरी लवाली होती. गोव्यात ३० सप्टेंबर आणि १० ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाची नोंद झाली. या दोन दिवसांच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. 

दरम्यान, राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत वादळी वाऱ्यासह हवामानात किरकोळ बदल होण्याची शक्यता असते. हवामान खात्याने राज्यात १४ ते १६ ऑक्टोबर याकालावधीत यलो अलर्ट जारी केला असून, वादळी वाऱ्यासह वीजांचा गडगडाट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सोमवारी राज्यात निरभ्र आकाश होते, वातावरणातील आद्रता ते दिवसा कडक ऊन अनुभवायला मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asha Bhosale Passed Away: आशाताई भोसले यांचे निधन, चिरंजीव आनंद भोसले यांनी दिली माहिती

Maratha history: प्रतापगडचा रणसंग्राम: शिवरायांच्या गनिमी काव्याने अफजलखानाचा माज उतरवला!

Bicholim: 'सिग्नल' बनले शोभेची वस्तू, डिचोली बगलमार्गावर यंत्रणा कार्यान्वित कधी होणार?

Canacona municipal election: काणकोण पालिका निवडणूक; इच्छुक उमेदवार लागले कामाला, गुडघ्याला बाशिंग बांधून तयार

Margao parking project: मडगावात पार्किंग प्रकल्प अजूनही कागदावरच, वाहतूक कोंडीची समस्या वाढली; आरक्षित जागा कचऱ्याचा ढिगारा, प्रशासनावर टीका

SCROLL FOR NEXT