Goa border tourist issues Dainik Gomantak
गोवा

Mollem Public Toilet: मोलेतील सुलभ शौचालय वापरायोग्य नाही; पर्यटकांची राज्याच्या सीमेवरच होतेय गैरसोय

Mollem Check post Toilet Issue: गोवा पर्यटन विकास महामंडळ किंवा पर्यटन खात्याने याची दखल घ्यावी व हे सुलभ शौचालय दुरुस्त करावे अशी मागणी होत आहे

Akshata Chhatre

मोले: मोले आउट पोस्ट येथे असलेल्या सुलभ शौचालयची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे.येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना पहाटे नैसर्गिक विधी करण्यास सुद्धा या सुलभ शौचालयाचा वापर करता येत नसल्याने पर्यटकांना त्रास सहन करावा लागतोय. विशेष करुन महिला पर्यटकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतोय. गोवा पर्यटन विकास महामंडळ किंवा पर्यटन खात्याने याची दखल घ्यावी व हे सुलभ शौचालय दुरुस्त करावे अशी मागणी होत आहे. 

व्हिक्टोरिया फर्नांडिस या पर्यटन मंत्री आणि विनय तेंडुलकर हे आमदार असताना असताना मोले येथील सुलभ शौचालयाचे उद्घाटन झाले होते, मात्र त्यानंतर कुणीही या सार्वजनिक शौचालयाची देखभाल केली नाही. विभागाकडून पाण्याचं बिल भरलं न गेल्याने या शौचालयात पाण्याची सोय उपलब्ध नाही, परिणामी निर्माण होणारी दुर्गंधी सोसायला अवघड असल्याने पर्यटक शौचालय वापरणं बंद करतायत आणि त्यांची गैरसोय होतेय, म्हणूनच गोव्याच्या सीमेवर असलेल्या या शौचालयाकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जातेय. 

सध्या या शौचालयाच्या दुरुस्तीकरणाचा विचार सुरु आहे. गावचे सरपंच सुहास गावकर माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार एका सर्वेक्षणात या शौचालयाचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला उपस्थित करण्यात आला होता.

शौचालयाची सोय उपलब्ध नसल्याने पर्यटक उघडव्यावर नैसर्गिक विधी पार पाडण्यासाठी जातात, यामुळे दुर्गंधी पसरते.

जर का या शौचालयाची जबाबदारी पूर्णपणे पंचायतीजवळ सोपवली तर पंचायत नक्कीच संबंधित कॉन्ट्रॅक्टरसोबत बोलून दुरुस्तीकरणाचं काम पूर्ण करेल, मात्र यामध्ये जाणाऱ्या वेळात पर्यटक इतर सरकारी शौचालयांचा वापर करू शकतील की नाही याची माहिती घेण्यासाठी लवकरच आमदारांची भेट घेण्यात येईल असं ते म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: आर्थिक बाबतीत सावधगिरी, करिअरमध्ये प्रगती; जाणून घ्या तुमच्या राशीचा आठवडा कसा असेल?

Goa Assembly Live: दाग- फोंडा येथील घराला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आग

Morjim: वाळूचे तेंब उद्ध्वस्त करून पार्किंग प्रकल्प नकोच! नागरिकांचा इशारा; पंचायत, आमदाराचा प्रकल्पाला पाठिंबा

Ameya Audi: अमेय अवदीचा युरोपात डंका! चेस्के बुदयोव्हिस स्पर्धेत विजेता, फ्रान्समध्ये तृतीय क्रमांक

Bicholim Murder: 'पोरक्‍या झालेल्‍या चिमुकलीला न्‍याय द्या'! डिचोली खूनप्रकरणी ग्रामस्‍थ आक्रमक; पोलिस स्थानकावर धडक

SCROLL FOR NEXT