Mollem Beef Smuggling Dainik Gomantak
गोवा

Mollem Beef Smuggling: मोलेत पहाटे 3 वाजेपर्यंत तणाव! 5.5 टन गोमांस जप्त, अनेकांचे जंगलात पलायन, 200 कार्यकर्ते एकवटले

Beef Smuggling Goa: मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सातच्‍या सुमारास बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना एका बागायतीत अनेक टन बेकायदा गोमांस जमा करण्‍यात आल्‍याची माहिती मिळाली.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: मोले येथील अजित मित्तल यांच्या बागायतीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी साडेपाच टन गोमांस पकडले. तसेच या बेकायदा प्रकरणात गुंतलेल्‍या दोघांना पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले. दरम्‍यान, पोलिसांनी एक रिक्षाही जप्‍त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रविवारी सायंकाळी सातच्‍या सुमारास बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना एका बागायतीत अनेक टन बेकायदा गोमांस जमा करण्‍यात आल्‍याची माहिती मिळाली.

लागलीच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्‍या बागायतीत जमिनीवर एक ताडपत्री टाकून त्यावर गोमांस ठेवलेले आढळून आले. तेथे एक रिक्षासुद्धा उभी होती. घरासमोर काही लोक होते, पण कार्यकर्त्यांना पाहून ते जंगलात पळाले. त्यापैकी दोघांना पकडण्‍यात आले. कुळे पोलिसांनी त्‍यांच्‍यासह रिक्षा ताब्‍यात घेतली.

मोले पशुवैद्यकीय डॉ. केतन चौगुले यांनी पकडलेल्या साडेपाच टन गोमांसाचा पंचनामा केला. तसेच नमुने घेऊन ते हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवले. सदर गोमांस खाण्यायोग्य नसल्यामुळे ते सर्व फिनेल ओतून नष्ट करण्यात आले.

२०० पेक्षा जास्‍त कार्यकर्ते एकवटले

रात्री ९ वाजेपर्यंत २०० पेक्षा जास्त कार्यकर्ते घटनास्थळी पोचले. या प्रकरणात गुंतलेल्‍यांना आमच्‍यासमोर आणा, अशी मागणी त्‍यांनी पोलिसांकडे लावून धरली. त्‍यांना आवरणे पोलिसांना कठीण बनले. त्‍यानंतर आणखी पोलिस कुमक मागविण्‍यात आली. शेवटी कार्यकर्त्यांची समजूत काढण्‍यात पोलिसांना यश आल्‍यावर रात्री ३ वाजता कार्यकर्ते माघारी फिरले.

पंधरा दिवसांत हजारो किलो गोमांस ताब्‍यात

मोले चेकनाक्‍यावर गेल्या सप्टेंबर महिन्यातील अखेरच्या आठवड्यात ६०० किलो तर ४ ऑक्‍टोबर रोजी ८०० किलो गोमांस पकडण्‍यात आले होते. आता याच चेकनाक्याच्या बाहेर काल साडेपाच टन गोमांस पकडण्‍यात आले. याचाच अर्थ असा की, कर्नाटकातून गोव्‍यात मोठ्या प्रमाणात बेकायदा गोमांसाची वाहतूक करण्‍यात येते. यासंदर्भात संबंधित खात्‍याने दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दखल करण्याची गरज असल्याचे मत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व्‍यक्त केले.

बागायतीच्‍या मालकाचे कानावर हात

ज्‍याच्‍या बागायतीत गोमांस आढळले त्‍या मित्तल नामक व्यक्तीने अज्ञातांविरोधात कुळे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आपल्‍याला कोणतीही कल्‍पना न देता गोमांस आपल्‍या जागेत ठेवण्‍यात आल्‍याचा दावा त्‍याने केला आहे. आपण आपल्या जागेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याचे त्‍याने सांगितले.

दरम्‍यान, ज्‍या रिक्षातून गोमांस आणले गेले, त्‍या रिक्षाचा मालक, चालक व अन्‍य साथीदार पळून गेले असून, पोलिस त्‍यांचा शोध घेत आहेत. बागायतीत काम करणाऱ्या कामगारांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात खऱ्या आरोपीचा शोध पोलिस निरीक्षक राघोबा कामत यांच्‍याशी संपर्क साधला असता त्‍यांनी सांगितले की, तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayem Lake: पुन्हा उघडतोय मयेचा तलाव, आमदार प्रेमेंद्र शेट यांनी स्वतः केली पाहणी; नेमकी तारीख काय? वाचा 

Sawantwadi Beef Smuggling: आत याल तर जीव देऊ! कात्री दाखवत महिलेची पोलिसांना धमकी; सावंतवाडीत 80 किलो गोमांस जप्त

"50 हजार तालांव, 48 तास कोलवाळ जेल", दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या पर्यटकांवर लोबोंनी काढलाय 'जालीम' उपाय!

टीम इंडियाचा ऐतिहासिक रेकॉर्ड! वेस्ट इंडीजला सलग 10व्या कसोटी मालिकेत चारली पराभवाची धूळ; दक्षिण आफ्रिकेच्या विक्रमाशी केली बरोबरी VIDEO

India Pakistan Conflict: "पाकिस्तान पहलगामसारखा आणखी एक हल्ला करू शकतो", लेफ्टनंट जनरल मनोज कटियार यांचा इशारा; भारत प्रत्युत्तर देण्यास सज्ज

SCROLL FOR NEXT