Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Crime: नोकरीच्या बहाण्याने विनयभंग; संशयिताला बंगळुरूमध्ये अटक

Goa Cyber Crime: आरोपीचे नाव मोहनराज व्ही. (२९, रा. बंगळुरू) आहे. तो एका बँकेत नोकरीला असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Cyber Crime

पणजी, सायबर गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या बंगळुरूतील संशयिताच्या मुसक्या आवळण्यात गोव्याच्या सायबर क्राईम शाखेच्या पोलिसांना यश आले. बँकेत नोकरी देण्याच्या बहाण्याने युवतीचे अश्लील फोटो काढून विनयभंग तसेच ब्लॅकमेल केल्याप्रकरणी संशयित पोलिसांना हवा होता.

आरोपीचे नाव मोहनराज व्ही. (२९, रा. बंगळुरू) आहे. तो एका बँकेत नोकरीला असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

३० एप्रिल रोजी चिंबल येथील एका युवतीच्या तक्रारीनुसार सायबर क्राईम शाखेने गुन्हा नोंदविला होता. संशयिताने फॅब कंपनी (फर्स्ट अबूधाबी बँक) येथे रिक्त पदासाठी नोकरीची खोटी जाहिरात प्रसिद्ध केली आणि टेलिग्राम ॲपद्वारे या युवतीशी संपर्क साधला.

संशयिताने तिला व्हिडिओ कॉलद्वारे मुलाखतीमध्ये सहभागी होण्याचे आमिष दाखवले. नंतर त्याने तिला विवस्त्र होण्यास भाग पाडले आणि तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, तसेच तिचे आक्षेपार्ह अवस्थेतले स्क्रीनशॉटस् घेतले.

त्यानंतर संशयिताने पीडित युवतीला ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली. त्याच्याकडील अश्लील साहित्य हटविण्यासाठी शारीरिक संबंधांची मागणी केली. या कालावधीत संशयिताने त्या युवतीला बंगळुरूला भेटायला बोलावले. अन्यथा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

सावज अलगद जाळ्यात

संशयिताने सांगितल्यानुसार ती युवती बंगरुळूला रवाना झाली. त्याचवेळी आरोपीला पकडण्यासाठी सायबर क्राईम पोलिसांनी सापळा रचला. संशयित पीडितेला भेटण्यासाठी आला, तेव्हा बराच पाठलाग करून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. उपअधीक्षक आशिष शिरोडकर, पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर, पोलिस उपनिरीक्षक सर्वेश सावंत, विनय आमोणकर, हेमंत गावकर यांनी अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.

आक्षेपार्ह साहित्य जप्त

संशयिताने पीडितेशी केलेले चॅट आणि फोनवर रेकॉर्ड केलेले व्हिडिओ सायबर क्राईम पोलिसांनी जप्त केले आहेत. त्याला मोबाईल फोन सायबर फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविला आहे. पुढील तपास सायबर क्राईम पोलिस स्टेशन रायबंदरचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर करीत आहेत.

सत्यता पडताळा : पोलिसांचा सल्ला

गोवा सायबर क्राईम पोलिसांनी लोकांना सल्ला दिला आहे की, ऑनलाईन नोकरीच्या अशा फसव्या जाहिरातींपासून सावध रहावे. एजन्सीच्या संपर्कात येण्यापूर्वी स्थानिक पोलिस किंवा जवळपासच्या सायबर पोलिस स्टेशनद्वारे कोणत्याही ऑनलाईन नोकरीच्या ऑफरची सत्यता पडताळून पाहावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT