Goa Government Dainik Gomantak
गोवा

Goa Government: दिवाळी सुट्टीबाबत सरकारने पुनर्विचार करावा : लोलयेकर

Goa Government: राज्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे सरकारने शालेय दिवाळीच्या सुट्टीत बदल केला आहे. या बदलामुळे तुलसीविवाह सणादिवशी असलेली सुट्टी रद्द झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Government: राज्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे सरकारने शालेय दिवाळीच्या सुट्टीत बदल केला आहे. या बदलामुळे तुलसीविवाह सणादिवशी असलेली सुट्टी रद्द झाली आहे. दिवाळीपेक्षा तुलसीविवाहासाठी लोकांना तयारी करावी लागते.

त्यामुळे सरकारने केलेल्या सुट्टीच्या बदलाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी केली.

यावर्षी दिवाळीची सुट्टी शिक्षण खात्याने ८ ते २६ नोव्हेंबर यादरम्यान निश्‍चित केली होती. मात्र, सरकारने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे त्यामध्ये मोठा बदल केल्याने शालेय शिक्षक व विद्यार्थ्यांत नाराजी आहे. या स्पर्धा होणार असल्याचे सरकारला अनेक महिन्यांपासून माहीत होते, त्यामुळे त्यांनी यापूर्वीच त्यात बदल करायला हवा होता.

काही शालेय शिक्षकांनी सुट्टीच्या काळातील बाहेरगावी जाण्याचा कार्यक्रम काही महिन्यांपूर्वीच आरक्षण करून निश्‍चित केलेला होता. मात्र, सरकारच्या या बदलामुळे शिक्षकांनी सुट्टीच्या काळात केलेल्या नियोजनावर पूर्णपणे पाणी फेरले आहे, असे लोलयेकर म्हणाले.

शिक्षकांना दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत विरंगुळ्यासाठी गोव्याबाहेर पडता येते. मात्र सरकारने ८ ते २६ नोव्हेंबर ऐवजी आता २५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर अशी दिवाळीची सुट्टी निश्‍चित केल्याने अनेक शिक्षकांनी केलेले नियोजन रद्द करावे लागणार आहे, असे लालयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Wimbledon Tennis: ॲलेक्झँडर झ्वेरेव अंतिम फेरीत; विंबल्डन टेनिस, आर्थर फेरीवर तीन सेटमध्ये मात

Goa U19 Cricket: गोव्याच्या फिरकी गोलंदाजांचा प्रभावी मारा; केरळला 302 धावांत रोखले; आफ्रिदचे 4, ओमचे 3 बळी

Goa Football Association: फुटबॉलपटूंच्या कल्याणासाठी 'GFA' कटिबद्ध; लवकरच खेळाडू संघटना स्थापनेसाठी प्रयत्न- कायतान फर्नांडिस

BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये! सलग पराभवानंतर इमर्जन्सी बैठक; रोहित-कोहलीचं कमबॅक, श्रेयस अय्यरची कॅप्टन्सी आणि गंभीरच्या भूमिकेवर होणार मोठा निर्णय?

Rotary Rain Run Goa: रोटरी रेन रन मॅरेथॉनमध्ये महिला पेसर्स; 26 जुलै रोजी शर्यत; तीन हजार धावपटूंचा सहभाग अपेक्षित

SCROLL FOR NEXT