Vishwajeet Rane
Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Government: ‘विकसित भारत’चे स्वप्न मोदी सरकार पूर्ण करणार!

दैनिक गोमन्तक

Goa Government: पंतप्रधान मोदींमुळे राज्यात तसेच देशभर विकास क्रांती घडत आहे. मोदीजींचे विकसित भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार पुन्हा बहुमतांनी निवडून येणार आहे. गेल्या दहा वर्षात राज्यात जो विकास झाला, तो फक्त त्यांच्यामुळेच, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केले.

जबाबदारी वाढली असून निवडणुकीत उत्तर गोव्याच्या उमेदवाराला बहुमतांनी निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय ‘गाव चलो’ उपक्रमाची आज वाळपई येथे श्री हनुमान मंदिरात श्री हनुमानाचे दर्शन घेऊन सुरूवात करण्यात आली. यावेळी विनोद शिंदे, देवस्थान समितीचे पदाधिकारी भानुदास वेलिंगकर, कालिदास मणेरकर, देवेश पेडणेकर आदींची उपस्थिती होती.

आरोग्यमंत्री म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर, पक्षसंघटना मजबूत करून गावोगावी पोहोचण्याचा प्रयत्न आहे.

मागील जाहीरनाम्यातील आश्‍वासनपूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. 10 वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात आली.

सत्तरीचा विकास हा झपाट्याने होत आहे. भाजप सरकारच्या डबल इंजिन सरकारमुळे हे शक्य झाले आहे,असेही राणे म्हणाले. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी वाळपई पालिका क्षेत्रात घराघरात फिरून सर्वांशी संवाद साधला.

बूथची जबाबदारी प्रवासी कार्यकर्त्यावर

या अभियानांतर्गत प्रत्येक बूथची जबाबदारी एका प्रवासी कार्यकर्त्यावर देण्यात आली आहे. या प्रवासी कार्यकर्त्यांचा संपूर्ण भेटीचा कार्यक्रम हा गाव संयोजकाने आखून त्याचे नियोजन केले आहे. या प्रवासादरम्यान प्रवासी कार्यकर्ते हे जनसंघापासून काम करणाऱ्या तसेच भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत.

भेटी, संवादातून संघटन

गावातील युवक, शेतकरी तसेच व्यावसायिकांच्या समूह बैठका घेणे, क्रीडाक्षेत्रात चमकलेल्या खेळाडूंची भेट घेणे, शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद , सामाजिक व धार्मिक क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्तींची भेट घेणे, बचतगटांच्या प्रतिनिधींची भेट घेणे, स्वच्छता, पर्यावरण रक्षण व संवर्धन करणे आणि खेळांमध्ये व अन्य आदींची भेट घेऊन सर्वांशी संवाद साधला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT