Damu Naik Dainik Gomantak
गोवा

GST कमी करून जनतेला मोदी सरकारची मोठी भेट! गोव्यातील हॉटेल व्यावसायिकांना होणार फायदा - दामू नाईक

Damu Naik: केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने जीएसटी करामध्ये बदल करत सर्वसामान्यांना दिलासा दिला असून अनेक जीवनावश्‍यक वस्तूंवरील कर रद्द केले.

Sameer Amunekar

पणजी: केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने जीएसटी करामध्ये बदल करत सर्वसामान्यांना दिलासा दिला असून अनेक जीवनावश्‍यक वस्तूंवरील कर रद्द केले. काही वस्तूंवर किरकोळ कर लावले आहेत. देशातील जनतेला मोदी सरकारने दिलेली ही मोठी भेट आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

ते पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सिद्धार्थ कुंकळकर, सर्वानंद भगत व इतर उपस्थित होते. दरम्यान नाईक म्हणाले, देशातील कृषी, शिक्षण, आरोग्य, जीवनावश्‍यक वस्तू, आदीवरील करामध्ये मोठ्या प्रमाणात घट करण्यात आली आहे.

त्यामुळे येत्या काळात मागणी वाढून उद्योगांनाही चालना मिळणार असून अर्थकारणालाही बळकटी लाभणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

गोवा हे पर्यटन राज्य आहे, त्यामुळे हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. हॉटेलवरील १२ टक्के असलेला कर ५ टक्के केल्याने त्याचा लाभ या व्यवसायाला होणार आहे. कॅसिनोच्या बाबतीत कर वाढविला असला तरी त्याचा सर्वसामान्यांवर परिणाम होणार नाही. ज्याला कॅसिनोत जायचे आहे तो जाईल. त्याचा महसूलावर देखील परिणाम होणार नसल्याचे नाईक यांनी सांगितले.

राहुल गांधी ज्याप्रमाणे आमच्यामुळे जीएसटी करात बदल केले, असे सांगतात तशी सवय गोव्यातही काही विरोधी नेत्यांना आहे. सरकारने एखादी चांगली गोष्ट केली की, ती आमच्यामुळे झाली. आम्ही याबाबत सांगितले होते, असे सांगायची अनेकांना सवय झाली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे जीएसटी समितीत असल्याने ते अनेक गोष्टी मांडत असतात. डबल इंजिन सरकराने एक भारत एक कर प्रणाली अंमलबजावणीच्या अनुषंगाने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pankaj Dheer: महाभारतातील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

‘त्या’ स्वप्नाला मूर्त स्वरुप येण्यापूर्वीच 'पात्रांव रवी नाईक' यांनी जगाचा निरोप घेतला

'चाणक्य हरपला'! फोंड्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाने सर्वपक्षीय नेत्यांमध्ये शोककळा

Goa Today's News Live: सार्वजनिक सुट्टीमुळे दावर्ली पंचायत निवडणूक रद्द, उडाला गोंधळ

Footprints and Frames: मुंबई ते गोवा मार्गावरील कथा पहा चित्रांमध्ये! नॉस्टेल्जीयाच्या पाऊलखुणा

SCROLL FOR NEXT