Bicholim Modern Fire Station Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोलीतील रखडलेल्या ‘मॉडर्न फायर स्टेशन’ला गती! पाच वर्षांनी प्रकल्पाचे काम सुरू

Bicholim Fire Station: गेल्या पाचहून अधिक वर्षांपासून रखडलेल्या आणि शहरातील एक महत्वाकांक्षी असलेल्या "मॉर्डन फायर स्टेशन" या अत्याधुनिक अग्निशमन दल केंद्र प्रकल्पाचे काम सध्या तीव्रगतीने चालू आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Modern Fire Station Construction Work

डिचोली: गेल्या पाचहून अधिक वर्षांपासून रखडलेल्या आणि शहरातील एक महत्वाकांक्षी असलेल्या "मॉर्डन फायर स्टेशन" या अत्याधुनिक अग्निशमन दल केंद्र प्रकल्पाचे काम सध्या तीव्रगतीने चालू आहे. कामाची सध्याची गती पाहता, या प्रकल्पाबाबत आशा आता पल्लवीत झाल्या आहेत. १६ जानेवारी २०१९ या दिवशी विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन सभापती डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती.

पायाभरणी केल्यानंतर मात्र या प्रकल्पाला एकएक ग्रहण लागत गेले. पायाभरणी नंतर लगेचच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि या प्रकल्पाच्या बांधकामाला चालना देण्यात अडथळा निर्माण झाला. त्यानंतर सहा महिन्यांनी या प्रकल्पाच्या कामाला चालना मिळाली.

महामारीचे संकट आणि अपुरा कामगारवर्ग यामुळे प्रकल्पाचे काम रेंगाळत पडले. मध्यंतरी सरकारने या प्रकल्पाच्या तत्कालीन दोन कंत्राटदाराचे कंत्राटही रद्द केले आहे, अशी माहिती मिळाली आहे. गेल्यावर्षी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला नव्याने चालना मिळाली आहे.

त्वरित स्वप्नपूर्ती व्हावी!

या प्रकल्पासाठी आमदार डॉ. शेट्ये हे आग्रही असून या प्रकल्पाची त्वरित स्वप्नपूर्ती व्हावी. यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यापूर्वी विधानसभेतही त्यांनी या प्रकल्पाविषयी प्रश्न उपस्थित करुन रखडलेल्या या प्रकल्पाच्या कामाला चालना देण्याची मागणी केली आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम तांत्रिक कारणामुळे रखडले आहे. हे मान्य करताना आता प्रकल्पाची स्वप्नपूर्ती लवकर पूर्ण होणार. याबद्दल मी आशावादी आहे, असे आमदार डॉ. शेट्ये यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT