civil defense mock drill Dainik Gomantak
गोवा

Mock Drills in India: सुरक्षा सरावाची तयारी सुरू! नागरिक, स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांना मॉक ड्रिलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

mock drills in goa: या राष्ट्रीय स्तरावरील नागरी सुरक्षा मॉक ड्रिलमध्ये गोव्यातील नागरिकांनी, स्वयंसेवकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेय

Akshata Chhatre

India vs Pakistan Mock Drill: भारत पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (७ मे) देशभरातील २४४ वर्गीकृत नागरी सुरक्षा जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार नागरी सुरक्षा सज्जतेची मोठी चाचणी होणार आहे. विशेष म्हणजे ही मॉक ड्रिल केवळ प्रशासकीय स्तरावरच नव्हे तर गावांमध्ये सुद्धा होणार असल्याने नागरिकांचा सक्रिय सहभाग यात महत्त्वाचा असेल.

या राष्ट्रीय स्तरावरील नागरी सुरक्षा मॉक ड्रिलमध्ये गोव्यातील नागरिकांनी, स्वयंसेवकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेय. भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियावरून पोस्ट जारी करत याबद्दल माहिती देण्यात आलीये. संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर नागरी संरक्षण यंत्रणा किती सक्षम आहे याची तपासणी या मॉक ड्रिलच्या माध्यमातून केली जाईल. देशातील इतर भागांप्रमाणे गोव्यात देखील मॉक ड्रिलची तयारी सुरु आहे.

बुधवारी होणाऱ्या मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याच्या धोक्याची सूचना देणारी यंत्रणा कार्यरत केली जाईल. तसेच आपत्कालीन परिस्थितीत भारतीय हवाई दलाशी त्वरित संपर्क साधण्यासाठी हॉटलाइन आणि रेडिओ संपर्क यंत्रणांची चाचणी घेतली जाईल.

शहरातील नियंत्रण कक्ष आणि पर्यायी नियंत्रण कक्ष किती प्रभावीपणे काम करतात, हे देखील तपासले जाणार आहे.

या मॉक ड्रिलचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सामान्य नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण. शत्रूकडून हल्ला झाल्यास अशा परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करायचा, याबाबत त्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल. यासोबतच, शहरात रात्रीच्या वेळी करण्यात येणारी क्रॅश ब्लॅकआउटची व्यवस्था आणि महत्वाच्या शासकीय तसेच खाजगी आस्थापनांचे तातडीने छलावरण करण्याची तयारी देखील तपासली जाईल.

या सरावात नागरी सुरक्षा दलाच्या विविध सेवा जसे की वॉर्डन सेवा, अग्निशमन दल, बचाव पथके आणि आवश्यक सामग्री व्यवस्थापन यांचाही कस लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT