arrested Dainik Gomantak
गोवा

मारहाण करून लुटायचे मोबाईल; पणजी पोलिसांनी केले अटक

दोघांना अटक: मोबाईल मालकांचा शोध सुरू

दैनिक गोमन्तक

पणजी: रात्रीच्यावेळी कांपाल व आजुबाजूच्या परिसरात बसलेल्या तरुणांना मारहाण करून लुटण्याच्या प्रकरणी पणजी पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली आहे. तरुणाच्या चोरलेल्या मोबाईलसह पोलिसांनी आठ मोबाईल्स त्यांच्याकडे जप्त केले आहेत. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक निखिल पालयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांची पार्श्‍वभूमी तपासण्यात येत असून त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या इतर सात मोबाईल मालकांचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे मेहबूब यल्लप्पा सईद (20, बिजापूर - कर्नाटक) व रवी नन्नू डोंगरे (24, जबलपूर - मध्य प्रदेश) अशी आहेत. ते फेरीपॉईंट - पणजी येथे राहत असल्याचे चौकशीत सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेडणेतील ऋतिक उदय वस्त (वय २४) हा तरुण कांपाल येथील उद्यानात रात्री पावणेबाराच्या सुमारास एकटाच बसला होता. तेव्हा दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी ऋतिक याच्याकडे असलेल्या वस्तूंची मागणी केली. त्याने देण्यास नकार दिल्यावर त्या दोघांनी मारहाण केली व निघून जात असताना ऋतिक त्यांच्या पाठोपाठ गेला. ते आयनॉक्स येथे पोहचले असता ऋतिकही त्यांच्याजवळ जाऊन त्याचा मोबाईल परत करण्याची विनंती करू लागला.

संतापलेल्या त्या दोघा संशयितांनी पुन्हा ऋतिकला मारहाण केली. यावेळी तेथे चित्रपटाची शूटींग सुरू होती त्यामुळे लोकांची वर्दळ होती. तेथे शूटिंग पाहण्यास आलेल्या एकाने या मारहाणीचा व्हिडिओ काढून तो पोलिसांना पाठवला. पोलिसांनी व्हिडिओ मिळताच क्षणाचा विलंब न करता साध्या वेशात त्या दोघा संशयितांचा शोध घेण्यास सुरू केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT