Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात पुन्हा सापडले मोबाईल

तुरुंग महानिरीक्षकांसमोर तस्करीचे कोडे: 30 फोन, चार्जर, तंबाखूजन्य व इतर वस्तू जप्त

गोमन्तक डिजिटल टीम

Colvale Jail कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे पुन्हा मोबाईल सापडल्याची घटना उघडकीस आली. गुरुवारी रात्री उशिरा तुरुंग महानिरीक्षकांनी राखीव दलाच्या जवानांसह येथे छापा टाकून ही कारवाई केली. यावेळी तब्बल 30 मोबाईल, चार्जर, तंबाखूजन्य व इतर आक्षेपार्ह वस्तू सापडल्या.

या कारागृहात ज्या ज्या वेळी छापा टाकला जातो, त्या त्या वेळी मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन, चार्जर तसेच तंबाखूजन्य पदार्थ सापडत असल्याने या वस्तू कैद्यांपर्यंत पोहोचतात तरी कशा, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

गुरुवारी रात्री तुरुंग प्रशासनाने कोलवाळ कारागृहात छापा टाकला होता. या कारवाईवेळी जप्त केलेले मोबाईल फोन व इतर वस्तू कोलवाळ पोलिसांच्या स्वाधीन केल्या आहेत. मंगळवार, 30 मे रोजी कारागृहात घडलेल्या गँगवारच्या पार्श्वभूमी गुरुवार, 1 मे रोजी रात्री उशिरा तुरुंग महानिरीक्षकांनी राखीव दल जवानांच्या मदतीने कारागृहात छापा टाकला.

यावेळी सुमारे 30 मोबाईल, चार्जर, हेडफोन, तंबाखू, गुटखा व अन्य आक्षेपार्ह वस्तू सापडल्या. शुक्रवारी या सर्व वस्तू नोंदणीनंतर पुढील कारवाईसाठी कारागृह प्रशासनाने कोलवाळ पोलिसांच्या स्वाधीन केल्या. त्यानुसार या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

दोनच दिवसांपूर्वी या कारागृहात दोन गटांमध्ये धुमश्‍चक्री झाली होती. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी हा छापा टाकला.

अधिकाऱ्यांना धरले धारेवर

दोन दिवसांपूर्वी या कारागृहात विजय कार्बोटकर व टारझन पार्सेकर यांच्या गटात वर्चस्ववादातून बाचाबाची तसेच हाणामारी झाली होती. यापूर्वी तुरुंग महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांनी दोनवेळा अशाच पद्धतीने छापा टाकून मोबाईल जप्त केले होते.

कारागृहात पोलिसांचा मोठा पहारा असतानाही कैद्यांकडे मोबाईल व वस्तू येतातच कशा, असे म्हणत तुरुंग महानिरीक्षकांनी अधिकारी वर्गाला धारेवर धरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT