Mobile phone thieves nabbed by Calangute police Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime News : पर्यटकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघा परप्रांतीयांना अटक

कळंगुट पोलिसांची कारवाई

Rajat Sawant

पर्यटकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करण्यात कळंगुट पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत झारखंड, आसाम येथील संशयितांकडून 1 लाख 30 हजार रुपयांचे 11 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून कळंगुट पोलिस पुढील तपास करीत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिसांनी बागा कळंगुट परिसरातून दोन संशयित व्यक्तींना पकडले. त्यांची अधिक चौकशी केली असता संशय आल्याने त्यांची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी संशयितांकडे विविध ब्रँडचे 11 मोबाईल फोन सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मोबाईल फोन्सची बाजारातील मूल्य 1 लाख 30 हजार रुपये एवढे आहे.

संशयितांची चौकशी केली असता संशयितांनी बागा समुद्रकिना-यावरून सदर फोन चोरी केल्याचे उघड केले. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी सूरज रविदास (27, रा. बार्देझ, मूळ, झारखंड) व सनी हुसैन दुल (29, मूळ. आसाम) या संशयितांना अटक केली आहे. ही कारवाई हेड कॉन्स्टेबल विद्यानंद आमोणकर, पोलिस कॉन्स्टेबल अमीर गरड, प्रवीण चोडणकर यांनी केली.

प्रकरणाचा पुढील तपास कळंगुट पोलीस स्टेशनचे पीएसआय रमेश हरिजन, पीआय परेश जी नाईक आणि एसडीपीओ पर्वरी विश्वेश व्ही कर्पे यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT