Goa Government Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session : गोव्यात आमदारांना आता मिळणार केवळ 5 वर्षांचीच माहिती

विधानसभा सभापतींचे निर्देश; नवीन निर्णयामुळे विरोधक आक्रमक

गोमन्तक डिजिटल टीम

विधानसभा अधिवेशनांमध्ये सदस्यांकडून सरसकट मोठ्या कालखंडाची माहिती मागविली जाते. याचा सर्वच यंत्रणेवर ताण येतो, असे सांगत सभापती रमेश तवडकर यांनी निर्देश देत यापुढे सदस्यांना केवळ पाच वर्षांचीच माहिती मागवता येईल, असे म्हटले आहे. यावर विरोधक आक्रमक झाले असून भाजप सरकारने पुन्हा एकदा लोकशाहीच्या पाठीत सुरा खुपसला आहे, असे म्हणत टीकेची झोड उठविली आहे.

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 ते 19 जानेवारी दरम्यान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सुचनेनुसार विधानसभा सदस्यांना यापूर्वीची केवळ पाच वर्षांचीच माहिती मागता येईल. काही सदस्य जाणीवपूर्वक 2010, 2014 पासूनची माहिती मागवतात. जी की बहुतांश वेळा उपयोगी नसते. मात्र, याचा विधानसभा कामकाज आणि प्रश्‍नोत्तर प्रशासनावर अतिरिक्त ताण पडतो. यामुळे सदस्यांना आवश्‍यक असलेले अचुक उत्तरे देण्यास विलंब देखील लागतो. त्यामुळेच सभापतींनी विधानसभा कामकाज अधिनियम 307/37 अन्वये मागील केवळ पाच वर्षांची माहिती मिळेल आणि सदस्यांनी तेवढीच माहिती मागावी, असे लेखी निर्देश सर्व विधानसभा सदस्यांना आणि मंत्र्यांना पाठविले आहे. या निर्णयामुळे विरोधक आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

...हा तर लोकशाहीचा खून!

माहिती मागवण्यावर मर्यादा घातल्याने विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. हा लोकशाहीचा खून असल्याचे म्हणत गोवा फॉरवर्डने निषेध व्यक्त केला आहे. तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव लवकरच भूमिका जाहीर करणार आहेत.

पावसाळी अधिवेशनामधील निर्णय

विरोधकांकडून जाणीवपूर्वक अतिरिक्त माहिती मागवली जाते, असे म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत सभापतींना पावसाळी अधिवेशनादरम्यान 10 जून रोजी या माहितीवर मर्यादा घालण्याची विनंती केली होती. त्यामुळे सभापतींनी विधानसभा कामकाज अधिनियम 307/37 नुसार माहिती देण्याबाबत केवळ पाच वर्षांची मर्यादा घातली आहे. तसे लेखी निर्देश विधानसभा वेबसाईट पोर्टलवर टाकत सर्व सदस्यांना पाठविले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT