'MLA Viresh Borkar's threatening complaint against us is wrong' Dainik Gomantak 
गोवा

'आमदार विरेश बोरकरांनी आमच्‍या विरोधात केलेली धमकीची तक्रार चुकीची'

आगशी सरपंच: आमच्‍याविरोधात खोटी तक्रार, पुरावे सादर करावे

दैनिक गोमन्तक

पणजी: सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी आमच्‍या विरोधात केलेली धमकीची तक्रार चुकीची आहे. पंचायत क्षेत्रातील झाड पाडल्‍यावरून किरकोळ वाद झाला होता, पण आम्‍ही त्‍यांना कसलीही धमकी दिली नव्‍हती. उलटपक्षी त्‍यांनीच आमच्‍याशी अरेरावीची भाषा वापरली, असे स्‍पष्टीकरण आगशीचे सरपंच झेवियर ग्रासियस यांनी दिले. येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपसरपंच सेल्सी गोन्‍साल्वीस, लुईझा सिल्‍वेरा आदी उपस्‍थित होते.

ग्रासियस यांनी सांगितले की, आगशी पंचायत क्षेत्रात पावसाळापूर्व कामे सुरू आहेत. पिलार परिसरात साफसफाईचे काम सुरू आहे. यावेळी येथे धोकादायक असलेले एक मोठे झाड पंचायतीने आपल्‍या अधिकारात काढून टाकले. हे झाड जीर्ण झाले होते. या परिसरात लोकांची वर्दळ असते. वाहनांची रहदारी सुरू असते. तसेच येथे शाळा असल्‍याने मुलांचीही रेलचेल असते. याचबरोबर झाडाखालून वीजवाहिन्‍या जातात. या सर्व गोष्टींचा विचार करून रितसर पंचनामा करून पंचायतीने ते झाड काढून टाकले, असे श्री. ग्रासियस यांनी यावेळी सांगितले.

झाड काढल्‍याविषयी आमदार बोरकर यांनी मला फोन करून जाब विचारला. तसेच ताबडतोब भेटण्यास बोलावले. मी इतर कामात व्‍यस्‍त असल्‍याने गेलो नाही. त्‍यानंतर दोन-तीन दिवसांनी येथे सुरू असलेल्‍या अन्‍य कामाच्‍या ठिकाणी येऊन आमदारांनी वाद सुरू केला. यावेळी त्‍यांच्‍यासोबत 45-50 लोक होते. त्‍यांनी आवाज चढवल्‍याने आम्‍हीही आवाज चढवला. यातून केवळ वादविवाद झाला. तरीही दुसऱ्या दिवशी आमदार बोरकर यांनी आमच्‍या विरोधात धमकी दिल्‍याची तक्रार दाखल केली आहे ती खोटी असल्याचे ग्रासियस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT