Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: ‘नाहक खर्च सरकारने टाळावा’

Vijay Sardesai: राज्य सरकार केवळ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करते व हे कार्यक्रम व्यवस्थापन कंपन्यांमार्फत केले जातात.

दैनिक गोमन्तक

Vijay Sardesai: राज्य सरकारच्या डोक्यावर सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे सरकारने केवळ भांडवली गुंतवणूक करावी व नाहक खर्च टाळावे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. राज्य सरकार केवळ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करते व हे कार्यक्रम व्यवस्थापन कंपन्यांमार्फत केले जातात.

पे पार्किंगसारख्या योजना म्हणजे सरकारी पाठिंब्यावर खंडणी मागण्याचा प्रकार असल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले. सरकारने मुलभूत सुविधा तयार कराव्यात. गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्या खऱ्या, पण सर्व बहुतेक तंबू घालून करण्यात आल्या. स्पर्धा संपली तंबू काढले. मात्र, सरकारच्या तिजोरीला भगदाड पडले. पे पार्किंगसारख्या योजना कार्यान्वित करण्याअगोदर मुलभूत सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

एका बाजूने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत 31 डिसेंबर रोजी सनबर्न होणार नाही असे सांगतात तर दुसऱ्या बाजूने आयोजकांकडून 31 डिसेंबरची सनबर्नची तिकिटे अजून विकली जात आहेत, असा दावा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केला. हे कसे होते, असा जाब विचारत 'सनबर्न'वाले सरकारचे जावई आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

SCROLL FOR NEXT