Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

MLA Vijai Sardesai: ...तर फातोर्ड्यात दीपोत्सव साजरा करु

फातोर्ड्यात सतत दहा वर्षे चालतोय दीपोत्सव

दैनिक गोमन्तक

मडगाव: फातोर्डा येथील दामबाब लिंग मंदिराजवळ फातोर्डा रहिवाशांनी सोमवारी वर्षपद्धती प्रमाणे दीपोस्तव साजरा केला. या कार्यक्रमामध्ये आमदार विजय सरदेसाई ही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी दामबाब तळीचे सुशोभितीकरण होऊन लोकार्पण झाल्यास या ठिकाणी गंगा आरतीच्या धर्तीवर दीपोत्सव साजरा केला जाईल असे आश्वासन आमदार देसाई यांनी दिले.

(MLA Vijay Sardesai celebrated Dipotsav at Fatorda)

या उत्सवात लोकांबरोबर विजय सरदेसाई, त्यांच्या पत्नी उषा, कन्या उर्वी आणि फातोर्डा येथील नगरसेवकांनी या सोहळ्यात भाग घेतला होता. यावेळी हा सर्व परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता. दरम्यान बोलताना सरदेसाई यांनी 2017 साली येथील दामबाबांच्यातळीचे सुशोभिकरण करून ती लोकांसाठी खुली करण्याची योजना आखली होती.

पण सुशोभिकरण योजना जमीन मालकाने परवानगी न दिल्याने पुर्ण होऊ शकलेली नाही. या तळीशी लोकांच्या भावना गुंतलेल्या आहेत. त्याची कदर करून गोवा सरकारने या तळीची दुरुस्ती आणि सुधारणा घडवून आणावी. सरकारने या तळीचा ताबा लोकांकडे दिल्यास आम्ही येथे गंगा आरतीच्या धर्तीवर दीपोत्सव साजरा करु असे ते म्हणाले यावेळी म्हणाले.

या दरम्यान बोलताना मंदार सावर्डेकर यांनी, सरदेसाई यांचे कौतुक करत 10 वर्षापूर्वी त्यांच्याच पुढाकारातून येथे हा दीपोत्सव साजरा करण्यास सुरूवात झाली होती. यापुढे हा उत्सव आणखी जोमाने साजरा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT