Vijay Sardesai Latest News Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : भोमा, खोर्ली येथील घरे, मंदिरे वाचविण्यासाठी बगलमार्ग वापरा : सरदेसाई

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचे मुख्य सचिवांना पत्र

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai : भोमा आणि खोर्ली येथील ‘राष्ट्रीय हमारस्ता ४-अ’चा विस्तार करून लोकांची घरे आणि गावातील मंदिरे पाडण्याऐवजी बगलमार्गाचा पर्याय वापरा अशी मागणी करणारे पत्र गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोव्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांना पाठविले आहे.

गावात विकास करताना स्थानिकांना विश्वासात घेऊन करायचा असतो. तो त्यांच्यावर थोपवायचा नसतो. लोकांनी सरकारला बगलमार्गाचा पर्याय सुचविला आहे. हा पर्याय कमी खर्चिक आहे. तरीही सरकार आपल्याच म्हणण्यावर का अडून बसले आहे ते कळत नाही, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

सदर रस्ता विस्ताराला यापूर्वी स्थानिकांनी विरोध केला होता. त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांची भेटही घेतली होती. मात्र त्यांचे म्हणणे मान्य करण्यास त्यांनी नकार दिला होता. सरदेसाई यांनी विधानसभेतही हा प्रश्र्न चर्चेस आणला होता.

मडकई, ओल्ड गोवा, कुंडई या गावांतील असाच प्रश्र्न बगलमार्गाचा पर्याय अवलंबून यापूर्वी सोडविला आहे. मग तेथेच तो पर्याय का स्वीरकला जात नाही? यात कुणाचे हितसंबंध तर गुंतलेले नाहीत ना? असे सवाल त्यांनी उपस्‍थित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT