सरदेसाई vs सावंत Dainik Gomantak
गोवा

सरदेसाई vs सावंत: 'एकतर त्या मंत्र्याचे नाव सांगा किंवा शब्द मागे घ्या’

दैनिक गोमन्तक

पणजी : तीन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला (Goa Assembly Session) ‘गरमागरमी’च्या वातावरणात सुरुवात झाली. मोलेतील तम्नार, दुहेरी रेल्वेमार्ग, चौपदरी महामार्ग प्रकल्प, ऑनलाईन शिक्षण, पुरग्रस्तांच्या मदतीकडे दुर्लक्ष तसेच म्हादईच्या मुद्यावरून सरकारला (Government) विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोंडीत पकडत नामोहरम केले. सरकारला उत्तरे देताना नाकीनऊ आले. त्यामुळे विधानसभा सभागृहात गोंधळ व गदारोळ माजला होता. दुसरीकडे, विरोधकांनी हा दिवस गाजवला. ((MLA Vijai Sardesai said Goan ministers call to save the rapist))

विधानसभेत दुपारच्या सत्रात लक्ष्यवेधी सूचना मांडण्यात आल्या होत्या. त्यापैकी ऑनलाईन शिक्षण सुविधा, राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम तसेच पूरग्रस्तांना मदत या तिन्ही सूचना एकापेक्षा दोन खात्यांशी संबंधित असल्याने सरकारकडे त्याचे सविस्तर उत्तर तयार नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यावरील उत्तर उद्यापर्यंत देतो, असे सांगण्याची वेळ आली. हे सरकार पूर्ण तयारीनिशी व अभ्यासपूर्वक अधिवेशनात आले नव्हते हे आजच्या कामकाजावरून दिसून आले.

पहिल्याच दिवशी विरोधक बरेच आक्रमक बनले, त्यामुळे अनेकवेळा खडाजंगी झाली. ज्यावेळी आमदार विजय सरदेसाई (MLA Vijai Sardesai) यांनी मंत्रीच बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी फोन करतात, असा आरोप केला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या वक्तव्याला आक्षेप घेतला आणि ‘एकतर त्या मंत्र्याचे नाव सांगा किंवा शब्द मागे घ्या’, अशी जोरदार मागणी केली. यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्यात बरीच ‘तू तू मै मै’ झाली. सरदेसाई यांनी शब्द मागे घेण्यास नकार दिल्याने वाद वाढत गेला. यावेळी मंत्री मुख्यमंत्र्यांच्या (CM Pramod Sawant) मदतीला धावून आले आणि नको ते आरोप सभागृहात करू नका, असे तावातावाने सांगू लागले. (MLA Vijai Sardesai said Goan ministers call to save the rapist)

अर्थसंकल्पीय चर्चेला मंत्र्यांचे उत्तर

1 नगरविकास मंत्री मिलिंद नाईक : राज्यभरातील पालिकांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन घेता येईल. यासाठी विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करेन. पालिका कायदा दुरुस्तीसाठी विधेयक सादर केले जाणार आहे. या सभागृहातील सदस्यांचे म्हणणे असेल तर ते चिकित्सा समितीकडे पाठवता येईल.

2 पर्यटनमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर म्हणाले, पर्यटकांना फिरत्या विक्रेत्यांचा त्रास होतो म्हणून त्यांच्यावर बंदी घातली. सरपंच, आमदार यांना विश्वासात घेऊन सर्व सुविधांची निर्मिती केली. किनाऱ्यावर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद केली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी इनडोअर स्टेडियम तयार केली आहेत. क्रीडा मैदाने कंपन्यांकडे देण्याचा विचार आहे. त्यातून मैदानांची देखभाल होऊ शकेल.

3 विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी क्रीडापटूंच्या बक्षिसांची रक्कम वर्षानुवर्षे दिली गेली नसल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, नगर नियोजन खात्याने तीन चटईक्षेत्र दिले तर गोव्यात काँक्रिटचे जंगल उभे राहील. बा.भ. बोरकर यांच्या कवितेतील गोवा नष्ट होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT