Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: सोनसडो प्लांटबाबत सद्यस्थिती स्पष्ट करा; मडगावच्या बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाची गरज

आमदार विजय सरदेसाई यांची मागणी

सुशांत कुंकळयेकर

Vijai Sardesai: मडगाव ही राज्याची व्यापारी राजधानी आहे. मडगावमध्ये आधुनिक आणि बहुउद्देशीय बसस्थानकाची गरज आहे, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली. तसेच सोनसडो येथील कचरा प्लांट घनकचरा व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सोपवण्याबाबत निर्णय झाला, त्याची सद्यस्थिती स्पष्ट करा, असेही सरदेसाई यांनी म्हटले आहे.

बुधवारी आमदार सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेतून विविध मुद्यांना हात घालत सरकारने त्यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.

मंगळवारच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा संदर्भ देत सरदेसाई म्हणाले की, केंद्र सरकारने गोव्याला 30,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. भरीव निधीचा उल्लेख असूनही मडगाव बसस्थानकाचा कोणताही विकास झालेला नाही.

मडगाव ही राज्याची व्यापारी राजधानी आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या विचारांशी सुसंगत आधुनिक आणि बहुउद्देशीय बसस्थानकाची गरज मडगावला आहे.

सोनसडो येथे इनर्ट कचऱ्याचा डोंगर झाला आहे. या प्लांटच्या भवितव्यावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या उच्चाधिकार समितीची तातडीची बैठक बोलवा. हा प्लांट घनकचरा व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सोपवण्याचा निर्णय यापूर्वी झाला आहे. त्याची सद्यस्थिती स्पष्ट करा.

फातोर्डा येथील दक्षिण जिल्हा रुग्णालयाचे खासगी वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर करण्याच्या प्रस्तावालाही सरदेसाई यांनी विरोध दर्शविला. लोकांनी वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी केली नसून त्याऐवजी पूर्ण सुसज्ज रुग्णालय हवे होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गोव्यातील विद्यार्थी अशा संस्थांच्या विरोधात असल्याचे अधोरेखित करून सरदेसाई यांनी खासगी कॅपिटेशन वैद्यकीय महाविद्यालयांबाबत नाराजी व्यक्त केली. दिगंबर कामत यांनी प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाला पाठिंबा आहे का, हे स्पष्ट करावे.

दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयात एम्स उभारण्यासाठी सरकारने प्राधान्याने काम करावे, असेही ते म्हणाले.

वारंवार वीज खंडित होण्याच्या त्रासापासून लोकांना वाचवण्यासाठी फातोर्डामध्ये वीज उपकेंद्राची गरज आहे. बोर्डा येथे रिंगरोडची गरज आहे. बहुउद्देशीय महाविद्यालयाच्या प्रकल्पाला गती द्यावी, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT