Mla Venzy Viegas Dainik Gomantak
गोवा

Floating Market: फ्लोटिंग मार्केट म्हणजे काय, व्हेन्झी व्हिएगस यांनी खारबांदसाठी काय मागणी केली?

What Is Floating Market: फ्लोटिंग फिशिंग गाव म्हणून चीनमध्ये जशी निर्मिती करण्यात आली आहे, तसे गाव निर्माण करूया, व्हिएगस म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, बाणावली मतदारसंघात पर्यटकांना आकृष्ट करणारे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यातील खारेबांद येथे थायलंडप्रमाणे फ्लोटिंग मार्केट उभारावे, अशी मागणी ‘आप’चे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी केली.

मागण्या आणि कपात सूचना सत्रात ते बोलत होते. व्हिएगस म्हणाले की, गोवा स्वच्छ राहण्यासाठी प्लास्टिक बंदी घालता येऊ शकते. अनेक पर्यटक प्लास्टिक पिशव्या घेऊन येतात. सिक्कीममध्ये येणाऱ्या पर्यटकांना प्लास्टिक बंदी घातली आहे, तर गोव्यालाही ते करता येऊ शकते.

शॅक्स मालक, टॅक्सी मालक हे राज्याचे काळीज आहेत, त्यांना दुखवता कामा नये. पर्यटन धोरणाची राज्याला गरज आहे. त्यासाठी त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. स्वदेश दर्शन योजना गरजेची आहे. बाणावलीत पर्यटनाविषयी प्रकल्प आणावेत. पर्यटन क्षेत्रात भांडवली गुंतवणूक व्हायला हवी, त्यासाठी केंद्रातून निधी आणावा.

‘केबल स्टे’ पूल ओर्ली या गावात आणावेत. ओर्ली ते मोबोर ‘केबल स्टे’ झाल्यास सुंदर समुद्र पाहण्याचा आनंद पर्यटकांना घेता येऊ शकतो. खारेबांद येथील बांदावर पोर्तुगीज काळात व्यावसायिक बोटी घेऊन येत, कालांतराने ते बंद झाले.

त्यामुळे खारेबांद येथे फ्लोटिंग मार्केट उभारावे. जलमार्गाच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत उभारल्यास थायलंडप्रमाणे फ्लोटिंग मार्केट होऊ शकते. त्याचा फायदा कामत व आलेमाव यांच्याही मतदारसंघांना होईल, असे व्हिएगस म्हणाले.

फ्लोटिंग फिशिंग गाव :

केरळमध्ये ‘पुवार’ हे जसे मच्छीमार गाव निर्माण झाले आहे, त्याप्रमाणे बाणावलीतही ते निर्माण केले जावे. त्यामुळे महसूल निर्माण होणारे गाव तयार होईल. कोलावा हे ‘फिशिंग गाव’ आहे.

बाणावलीत मच्छीमार मोठ्या प्रमाणात आहेत, तसेच तेथे मासळीचा व्यवसाय करणारी गावे आहेत. फ्लोटिंग फिशिंग गाव म्हणून चीनमध्ये जशी निर्मिती करण्यात आली आहे, तसे गाव निर्माण करूया, व्हिएगस म्हणाले.

पेडा-वार्का पूल मोडेल म्हणून सांगितले होते. राजगीर (बिहार) प्रमाणे पेडा-वार्का येथे काचेचा पूल उभारावा, त्यामुळे हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून पुढे येईल. बाणावलीत १४ सेल्फी ठिकाणे आहेत, त्यासाठी आपण निधी मागूनही दिला जात नाही. बाणावलीच्या किनाऱ्यांवर ‘सीसीटीव्ही’ची गरज आहे. याशिवाय येथील किनाऱ्यांवर दिव्यांगांसाठी जाण्यासाठी मार्ग असावा, अशी मागणी केली आहे.

- व्हेन्झी व्हिएगस, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Nakshatra Gochar: सूर्याचा शनिच्या नक्षत्रात धमाका! 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; धनलाभासोबतच पद-प्रतिष्ठेत होणार मोठी वाढ

VIDEO: अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाणारं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं, लँडिंगवेळी थरार; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

शाळा सुटली, पण घर गाठण्यापूर्वीच काळ आला! 6 वीतील चिमुरडीवर अ‍ॅसिड फेकून नराधमानं काढला पळ; महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा

Delhi Fire: दिल्लीत भीषण अग्नितांडव! चार मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी, 9 जणांचा होरपळून मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मॅजिस्ट्रेट चौकशीचे आदेश VIDEO

Fake Currency Racket Bust: बेळगावात बनावट नोटांच्या टोळीचा पर्दाफाश! गोव्यातील तिघांसह बिहारच्या तरुणाला अटक; 500 च्या नोटांचे पाकीट जप्त

SCROLL FOR NEXT