Venzy Viegas | Goa Delegation Delhi Visit  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: गोव्याच्या शिष्टमंडळाची अमित शाह यांच्यासोबतची भेट म्हणजे गोवेकरांच्या डोळ्यात धुळफेक

आम आदमी पक्षाचे आमदार वेन्झी व्हीएगस यांची टीका

Akshay Nirmale

Mahadayi Water Dispute: म्हादई प्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील इतर मंत्र्यांच्या शिष्टिमंडळासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधवारी भेट घेतली. दरम्यान, यावरून आम आदमी पक्षाचे बाणावलीचे आमदार वेन्झी व्हीएगस (Venzy Viegas) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

व्हेन्झी व्हिएगस यांनी म्हटले आहे की, गोवा शिष्टमंडळाची दिल्ली भेट म्हणजे म्हादई प्रश्नावर राज्य सरकारने पुन्हा गोवेकरांच्या डोळ्यात केलेली धुळफेक आहे. म्हादई प्रश्नी गोव्याचा वाद कर्नाटकसोबत आहे. हा आंतरराज्य प्रश्न आहे. त्यामुळेच हा वाद इंटर स्टेट रिव्हर वॉटर डिस्प्युट अॅक्ट 1956 अंतर्गतच सोडवता येणार आहे. त्यामुळे यात केंद्रीय गृह मंत्रालयाचा संबंधच काय? त्यामुळे म्हादईच्या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह किंवा केंद्रीय जलस्त्रोत मंत्री गजेंद्रसिंह शेखावत हे नेते तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालय काहीही करू शकत नाही.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिष्टमंडळासह बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. म्हादईविषयी गोव्याची बाजू शिष्टमंडळाने सविस्तरपणे अमित शाह यांच्यासमोर मांडली. म्हादई प्रश्नात लक्ष घालू, असे आश्वासन अमित शाह यांनी दिल्याचे सांगण्यात आले होते. कळसा आणि भांडुरा या म्हादईच्या उपनद्यांचे पाणी वळविण्यासाठी केंद्रीय जलआयोगाने कर्नाटकाच्या सुधारित सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) दिलेली मंजुरी रद्द करावी, तसेच म्हादई पाणी प्राधिकरण स्थापन करावे अशा मागण्यांचे निवेदन यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने अमित शाह यांना देण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Farmers Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष मुंबईच्या बैठकीकडे! सॅलरी वाढीबाबत काय आहे नवा प्लान? 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे हायलाइट्स

Ranji Trophy 2026: पिठिया, भार्गवच्या फिरकीचा गोव्याला फटका! बडोद्याने फॉलोऑन लादला; पराभवाची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT