MLA Reginald inspects Sonsodo work Dainik Gomantak
गोवा

आमदार रेजिनाल्ड यांनी केली सोनसोडो कामाची पाहणी

आरडीएफची दुर्गंधी टाळण्यासाठी टाकाऊ कचऱ्यावर रासायनिक फवारणीची सूचना

दैनिक गोमन्तक

Alex Reginald Lawrence : कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आज सकाळी मडगाव पालिका अधिका-यांसमवेत सोनसोडोला भेट दिली व तेथील एकंदर स्थितीची पहाणी केली. तेथील आरडीएफ हटविताना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी फैलावते, अशा तक्रारी राय आणि कुडतरीतील लोकांकडून आल्याने त्यांनी तेथील स्थितीचा आढावा घेतला. (MLA Reginald inspects Sonsodo work)

आलेक्स यांनी यावेळी पालिकेला आरडीएफवर रासायनिक फवारणी करण्याची सूचना केली. सोनसोडो समस्या (Sonsodo project) सोडविण्यासाठी एक विस्तृत बैठक बोलावण्याचा संकेत त्यांनी दिला. 'आजवर ज्या ज्या सरकारांनी ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला त्यांना आपण पाठिंबा दिला आता आपण सरकारचा भाग असून सोनसोडो समस्या सोडाविणे हा आपला प्राधान्यक्रम असेल', ते म्हणाले.

दरम्यान रेजिनाल्ड (Alex Reginald Lawrence) यांनी आज सकाळी कुडतरीतील शेतक-यांची बैठक घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी लवकरच कृषी व जलस्त्रोतसह सर्व संबंधित खात्यांची बैठक बोलावून शेतक-यांच्या सर्व समस्या नव्या हंगामापूर्वी सोडविण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Merchant Trophy: टीमच्या 168 धावा, त्यात सलामीवीराचे शतक! गोव्याच्या 'अदीप'ची झंझावाती खेळी; आंध्रची सामन्यावर मजबूत पकड

Cooch Behar Trophy 2025: गोव्याच्या लेगस्पिनरची कमाल! टिच्चून मारा करत पटकावले 6 बळी; चंडीगडविरुद्धचा सामना रंगतदार अवस्थेत

Pilgao Mining: 'धडधडीमुळे झोप लागत नाही'! खाणवाहतुकीविरुद्ध ग्रामस्थ संतप्त; रस्त्यावर उतरून अडवले ट्रक Watch Video

Goa ZP Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्‍या! जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी 8,69,356 मतदार बजावणार हक्क; 5 तृतीयपंथीय मतदार रिंगणात

Goa Liberation Day 2025: गोवा मुक्तीचा 'तो' ऐतिहासिक लढा...! संयुक्त राष्ट्रात भारतासाठी रशियाने घेतला संपूर्ण जगाशी पंगा; फेल झाली अमेरिका-ब्रिटनची चाल

SCROLL FOR NEXT