mla Michael lobo cm sawant meet hm amit shah in delhi Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'मायकल' होणार 'मंत्री'? दिल्लीत मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत घेतली अमित शहांची भेट

MLA Michael Lobo Meet Amit Shah: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मायकल लोबो यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

Manish Jadhav

MLA Michael Lobo Meet Amit Shah: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यासह राज्यातील अनेक बडे नेते सध्या दिल्लीत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना पुन्हा ऊत आला आहे. मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असल्याने कोणाला डच्चू मिळणार आणि कोणाला लॉटरी लागणार, याबाबतच्या चर्चा ऐकू येत आहेत. याचदरम्यान, आमदार मायकल लोबो यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याबरोबर सोमवारी (30 जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

मायकल लोबोंनी घेतली अमित शहांची भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मायकल लोबो (Michael Lobo) यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. आता ते केंद्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांचीही भेट घेणार आहेत. राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा असताना लोबो आणि शहा यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. आमदार लोबो दाम्पत्यापैकी कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोबो यांचे मंत्रिपद निश्चित झाले असून, त्यासाठीच ते दिल्लीला पोहोचले आहेत.

दुसरीकडे, 5 जून रोजी रात्रीच भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष गोव्यात आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. कारवार दौऱ्यापूर्वी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चाही केली होती. याचदरम्यान लोबो यांनी तातडीने दिल्लीकडे कूच केल्याचे सांगण्यात आले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून लोबो यांना बोलावणे आले आहे. या दौऱ्यात ते दिल्लीतील ओळखीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असून त्यानंतर ते गोव्यात परतणार आहेत. पक्षातील विश्वासू नेते म्हणून ओळखले जाणारे लोबो यांनी यापूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आठ आमदारांचा गट आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT