MLA Michael Lobo & Digambar Kamat
MLA Michael Lobo & Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition: आमदार कामत, लोबो अपात्रता सुनावणी 17 ऑगस्टपर्यंत तहकूब

दैनिक गोमन्तक

पक्षविरोधी कारवायाप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार दिगंबर कामत व आमदार मायकल लोबो यांच्याविरुद्ध आमदार अपात्रतेची याचिका सादर केली आहे. त्यावरील सुनावणी सोमवारी सभापतींसमोर झाली.

कामत व लोबो यांनी या याचिकेला उत्तर देऊन ही याचिका फेटाळण्यात यावी अशी विनंती सभापतींना केली आहे.

पक्षविरोधी कारवाया करण्यात आलेले आरोप खोटे आहेत अशी बाजू मांडण्यात आली. त्याला याचिकादाराच्या वकिलांनी आक्षेप घेतला. काही वेळ ही सुनावणी सुरू राहिल्यानंतर तहकूब करून ती आता 17 ऑगस्टला ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपवासी झालेले काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत व आमदार मायकल लोबो यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अमित पाटकर यांच्या या याचिकेला आव्हान दिले होते.

विधानसभा सदस्यच आमदार अपात्रता याचिका सादर करू शकतो व पाटकर हे सदस्य नसल्याने याचिका फेटाळण्याची विनंती केली होती. न्यायालयाने विनंती फेटाळून लावताना पाटकर यांना दिलासा दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

Goa Top News: कोलवा महिला मारहाण प्रकरण, कुठ्ठाळीत खून, मडगावात भाजपला गळती; गोव्यातील ठळक बातम्या

Goa: ड्रमर मित्राने दोन दिवस फोन उचलला नाही; दरवाजा उघडल्यावर जे दृष्य दिसलं ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले

Goa DGP जसपाल यांची 'दादागिरी' सुरुच, जाता - जाता पोलिस अधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाया

Bicholim Road Potholes: भयानक अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करा; वाहनचालकांची मागणी

SCROLL FOR NEXT