कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

Goa DGP Jaspal Singh: आसगाव प्रकरणानंतर जसपाल यांच्या बदलीबाबत सर्वच स्तरातून मागणी केली जात होती.
DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना; कोणत्याही क्षणी बदली आदेशाची शक्यता
Goa DGP Dainik Gomantak, Canava
Published on
Updated on

आसगाव येथील आगरवाडे कुटुंबीयांचे घर मोडतोड प्रकरणामुळे वादात सापडलेल्या पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची कोणत्याही क्षणी बदली होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने केंद्रीय गृह खात्याला याबाबत तसा अहवाल देखील पाठवला होता. बदलीबाबत जोरदार चर्चा सुरु असताना पोलिस महासंचालक तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांच्या बदलीबाबत जोरदार खलबंत सुरु आहेत. कोणत्याही क्षणी जसपाल यांच्या बदलीचे आदेश जारी केले जाऊ शकतात. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत देखील सध्या दिल्लीत असल्याने याबाबत वेगाने निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशात जसपाल सिंग देखील तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने त्यांच्या बदलीबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे.

आसगाव प्रकरणानंतर जसपाल यांच्या बदलीबाबत सर्वच स्तरातून मागणी केली जात होती. विरोधकांनी सिंग यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी लावून धरली होती.

DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना; कोणत्याही क्षणी बदली आदेशाची शक्यता
Goa: ड्रमर मित्राने दोन दिवस फोन उचलला नाही; दरवाजा उघडल्यावर जे दृष्य दिसलं ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले

या प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्माला या प्रकरणी क्राईम ब्रांचच्या एसआयटीने समन्स बजावला होता. मात्र, त्याला पूजाने दांडी मारत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

अटकपूर्व जामिनावरील आज झालेल्या सुनावणीत पोलिसांनी दाखल केलेल्या उत्तराला जोडउत्तर देण्यासाठी शर्माच्या वकिलांनी वेळ मागितला आहे. पणजी सत्र न्यायालयाकडून आता येत्या शुक्रवारी 5 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे याप्रकरणातील अटक संशयितांना न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com