Goa DGP जसपाल यांची 'दादागिरी' सुरुच, जाता - जाता पोलिस अधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाया

Goa DGP: पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांना ताबोडतोब मुक्त करा अशी मागणी आमदार कार्लुस फेरेरा यांनी केली आहे.
जसपाल यांची 'दादागिरी' सुरुच, जाता - जाता पोलिस अधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाया
Goa DGP Jaspal SinghDainik Gomantak

मावळते पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी जाता-जाता आपले न ऐकणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना इंगा दाखवण्याच्या इराद्याने कारवाया सुरू केल्यामुळे राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

'गोमन्तक' ला दिल्लीतून मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने जसपाल सिंग यांची गोव्यातून हकालपट्टी करण्यासाठी रेटा लावला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वतः दिल्लीत आहेत. परंतु काही कारणामुळे गृहमंत्रालयाच्या निर्णयाला विलंब लागत आहे. संसदेचे अधिवेशन सुरू आहे, हे एक कारण असू शकते.

दिल्लीतील उच्चसूत्रांनी या प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार गोव्याने जसपाल सिंग यांच्या हकालपट्टीसाठी आवश्यक सूचना दिल्लीला पाठविली आहे व त्यासाठी गृह खात्याकडे तगादाही लावला आहे.

परंतु 'डबल इंजिन' सरकार असूनही राज्याच्या विनंतीची तातडीने दखल घेतली गेलेली नाही. "त्यांची बदली नक्की होणार आहे, आदेश कधी निघतो याची आम्ही वाट पाहत आहोत", अशी माहिती गोव्याच्या वरिष्ठ सूत्रांनी दिल्लीहून दिली.

जसपाल यांची 'दादागिरी' सुरुच, जाता - जाता पोलिस अधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाया
नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील निर्दोष सुटलेल्या आणि खटला लढणाऱ्या वकिलाचा हिंदू जनजागृती समितीकडून गोव्यात सत्कार

परंतु आदेश येण्यास वेळ लागतोय हे लक्षात येताच जसपाल सिंग यांनी सूडबुद्धीने अधिकाऱ्यांना सतावणे सुरू केले आहे. त्यांनी आपल्या खात्याकडून अधिकाऱ्यांचे 'कॉल रिकॉर्डस्' मागून घेतले आहेत. पोलिस प्रमुख असल्याने त्यांना ते ताबडतोब मिळाले.

गेल्या आठ दिवसांत कोण अधिकारी पत्रकार व राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते का, त्यांनी आपणाविरोधात कोणती माहिती दिली का, याची चाचपणी जसपाल सिंग यांनी सुरू केली आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

राज्य सरकार अत्यंत दुर्बल

"राज्य सरकारने जसपाल सिंग यांना ताबडतोब पदावरून मुक्त करायला हवे, कारण त्यांनी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. गोवा सरकार अशा अधिकाऱ्यांवर कसलीही कारवाई करू शकत नाही. कारण त्यांचे संपूर्ण नियंत्रण गृहमंत्रालयाकडे असते व या बाबतीत राज्य सरकार अत्यंत दुर्बल आहे," असा आरोप आमदार कार्लुस फेरेरा यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com