Jit Arolkar Dainik Gomantak
गोवा

Jit Arolkar: लोकांना पाठिंबा देत राहणार, फाईलच्या धमक्यांना घाबरत नाही... आमदार आरोलकर यांचे प्रत्युत्तर

गोव्यातील 90 टक्के घरे बेकायदा असल्याचा आरोप

Akshay Nirmale

MLA Jit Arolkar on TCP Minister Vishwajit Rane: पेडणे तालुक्यातील झोनिंग प्लॅनवरून राज्यात राजकारण तापू लागले आहे. आज, शुक्रवारी संध्याकाळी नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी आमदार जीत आरोलकर यांच्यावर टीका केल्यानंतर आता आरोलकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मी लोकांच्या बाजून उभा आहे कारण लोकांच्या बाजूने उभे राहणे ही माझी जबाबदारी आहे, असे प्रत्युत्तर आमदार आरोलकर यांनी दिले आहे.

आमदार आरोलकर म्हणाले की, नगर नियोजन मंत्र्यांना लोकांची घरे उद्धवस्त करायची असतील करावीत. मी माझ्या घराचा त्याग करायला तयार आहे. गोव्यातील 90 टक्के घरे बेकायदेशीर आहेत. कारण लोक परवानगी घ्यायला नगर नियोजन कार्यालयात जात नाहीत.

नगर नियोजन खात्याची परवानगी घेत नाहीत. लोकांसोबत उभे राहणे ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. माझी फाईल दाखविण्याच्या धमक्यांना मी घाबरत नाही. आव्हानाला सामोरे जायला तयार आहे, मी नेहमी लोकांसोबत राहीन, असे प्रत्युत्तर आमदार आरोलकर यांनी दिले आहे.

मंत्री विश्वजीत राणे यांनी आरोलकरांवर आरोप करताना, आरोलकर हे माझ्या घरी आले होते. त्यांनी एक लाख चौरस मीटर जमिनीचे रूपांतर करण्याची मागणी केली होती. पण मी त्यांनी मी दलाल नाही, असे सांगून नकार दिला.

आता तेच आरोलकर जमिन रूपांतरला विरोध करत आहेत. त्यांनी अनेक बेकायदा कामे केली आहेत. अशांना व्हिडिओद्वारे विधानसभेत उघडे पाडणार आहे. मी आरोलकरांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत नाही. ते एक सामान्य आमदार आहेत.

आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. 200 मतांनी निवडून आलेल्यांनी मला शिकवू नये, अशी टीका मंत्री राणे यांनी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT