Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

MLA Delilah Lobo: शिवोलीतील पाणी प्रश्न मिटवणार; सोनारखिंड येथे जलशुद्धीकरण केंद्र तर आसगावात पाण्याची टाकी...

आमदार डिलायला लोबो यांचे आश्वासन

गोमंतक ऑनलाईन टीम

MLA Delilah Lobo: शिवोली मतदारसंघातील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आसगाव येथील सोनारखिंड येथे 5.6 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र तर आसगाव येथे 300 घनमीटरची नवीन पाण्याची टाकी बांधणार आहे.

त्यामुळे मतदारसंघातील पाण्याची समस्या कायमची दूर होईल, असा विश्वास आमदार डिलायला लोबो यांनी व्यक्त केला. शिवोली मार्केटमध्ये नूतनीकरण केलेल्या टॉयलेट ब्लॉकच्या उद्घाटनानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

आमदार लोबो म्हणाल्या की, आसगाव येथील सध्याची पाण्याची टाकी 150 घनमीटरची आहे. तिलाही गळती लागली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्थानिकांनी टॉयलेट ब्लॉकची आवश्यकता व्यक्त केली होती. याचा समावेश जाहीरनाम्यात देखील केला होता.

आज आम्ही मार्केटमध्ये नूतनीकरण केलेल्या टॉयलेट ब्लॉकचे उद्घाटन केले आहे. शौचालयाची देखभाल पंचायत करेल आणि ही सेवा मोफत दिली जाईल.

त्या म्हणाल्या, शिवोलीमध्ये ड्रग्ज तस्करीबाबत लोबो म्हणाल्या की, ड्रग्ज तस्करी हा प्रत्येकासाठीच चिंतेचा विषय आहे आणि केवळ पंचायत किंवा आमदारच नव्हे तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की त्यांनी सतर्क राहून तरुण या व्यसनापासून सुरक्षित राहतील, याची काळजी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saudi Aramco Missile Attack: जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला, क्राउन प्रिन्सच्या इशाऱ्यानंतर हूतींची काही तासांतच दुप्पट वेगाने कारवाई VIDEO

खरी कुजबुज: शतक कोण ठोकणार, 'बोल्‍ड' कोण होणार?

Land Mutation Process: 'म्युटेशन'साठी 50 हजारांपर्यंत वसुली? दक्षिण गोवा वकील संघटनेचा भ्रष्टाचाराचा आरोप

Horoscope 14 Oct 2026: नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग! 'या' 5 राशींचं चमकणार नशीब; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Goa Health News: राणेंची गोमेकॉला मध्यरात्री भेट; अनेकांची उडाली झोप! आपत्कालीन सेवांचा घेतला आढावा

SCROLL FOR NEXT