MLA Sankalp Amonkar  Dainik Gomantak
गोवा

MPA Goa: आमदार आमोणकरांनी दिला इशारा; 'एमपीए'च्या 9 नंबर गेटमधून बॉक्साईट वाहतूक झाली बंद

एमपीएचा बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही

दैनिक गोमन्तक डिजिटल

Mormugao Port Authority Goa: मुरगाव पोर्ट अथॉरिटी (MPA) कडून मुरगावच्या लोकांना अतिशय चुकीची वागणूक दिली जात आहे. एमपीए लोकांना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळेच लोकांना वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.

जर एमपीएने स्वत:च्या आदेशाचे पालन केले नाही तर गेट क्र. 9 वरून सर्व वाहतूक बंद करण्यास भाग पाडू, असा इशारा मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी दिल्यानंतर एमपीएच्या गेट क्र. 9 वरुन सूरु असलेली बॉक्साईट वाहतूक बंद करण्यात आली.

मुरगाव बंदरातून होणारी कोळसा, बॉक्साईट ही अवजड वाहनातून होणारी वाहतूक गेट क्र. 1 मधून करावी असा आदेश एमपीएने काढला. मात्र एमपीएने स्वतःच्याच आदेशाचे पालन न करता गेट क्र. 9 मधून अवजड वाहने सोडत असल्याने वास्को शहरासह देस्तेरो वाडा, एलमॉन्त थिएटर, रुमडावाडा, जेटी हेडलॅण्ड सडा आदी भागात प्रदूषणाची समस्या निर्माण झाली.

कोळसा व बॉक्साईटच्या भुकटीमुळे परीसर प्रदूषित झाला आहे. घराघरात कोळशाचे, बॉक्साईटचे थर तयार झाले आहेत.

अवजड वाहनातून वाहतूक 9 क्र. गेटमधून चालू असल्याने आयओसी जंक्शन ते सडा पर्यन्तचा राष्ट्रीय महामार्ग बॉक्साईटमुळे लालबुंद झाला आहे. याचा वाहनचालकांसह पादचारी तसेच या भागातील नागरिकांना त्रास होत आहे. भुकटीचा आरोग्यावर विपरीत परीणाम होत असल्याने लोक आजारी पडत आहेत.

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी एमपीएला याबाबत फटकारले. एमपीएने स्वत:च्या आदेशाचे पालन केले नाही तर गेट क्रमांक 9 वरून सर्व वाहतूक बंद करण्यास भाग पाडू, असा इशारा आमदार आमोणकर यांनी दिला.

एमपीएने काढलेल्या आदेशानुसार सर्व अवजड वाहने गेट क्र. 1 मधून बाहेर पडली पाहिजे. तसेच ट्रकवर ताडपत्री घालून वाहतूक करणे क्रमप्राप्त आहे. यापुढे एमपीएचा बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार संकल्प आमोणकर यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT