MLA Alex Sequeira Dainik Gomantak
गोवा

MLA Alex Sequeira: काहीजण बोरी पुलाबाबत शेतकऱ्यांच्या मनात भीती भरवत आहेत; आमदार आलेक्स सिक्वेरा यांचा आरोप

Akshay Nirmale

MLA Alex Sequeira: बोरी येथील प्रस्तावित नवीन पुलाला स्थानिकांकडून विरोध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोटली येथील शेतकरी, ग्रामस्थांनी आज, गुरूवारी नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांची भेट घेतली. यावेळी आमदार सिक्वेरा यांनी शेतकऱ्यांच्या म्हणणे ऐकून घेत चर्चेतून प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.

यावेळी शेतकरी अल्बर्ट परेरा म्हणाले की, आम्हाला पूल नको कारण त्यामुळे आमच्या खाजण जमिनी उद्धवस्त होणार आहेत. आमदारांनी या मुद्यावर चर्चा करू, आणि योग्य मार्ग काढू असे म्हटले आहे.

पण जो पूल आमच्या खाजण जमिनींतून जाणार आहे, तो आम्हाला नकोच आहे, याबाबत आम्ही ठाम आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यावर आमदार आलेक्स सिक्वेरा म्हणाले की, नवीन पूल ही काळाची गरज आहे. सल्लागारांनी 7 वेगवेगळी प्रपोजल्स दिली आहेत पण मी त्यातील एकही पाहिलेले नाही. मला 99 टक्के खात्री आहे की, शेतकऱ्यांनीही ते पाहिलेले नाही.

काहीजण शेतकऱ्यांच्या मनात भीती भरवत आहेत की या पुलामुळे शेतकऱ्यांची जमिन जाणार आहे. शेतकरी उद्धवस्त होतील. त्यामुळे लोक याला विरोध करत आहे. मी त्यांना सुचविले आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांसोबत बैठक घेऊया.

मी त्यांना फोन केला. ते बाहेर होते. ते सोमवारी परतणार आहेत. आमच्या चर्चेत गुरूवारी बैठक घेण्याबाबत ठरले आहे. कारण त्या बैठकीसाठी सल्लागारदेखील उपस्थित राहतील. या दोघांसमवेत पाच सदस्यीय शिष्टमंडळाची बैठक घेतली जाईल. चर्चेतून प्रश्न सोडवू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT