Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

Margao Municipality: निधीचा गैरवापर; रायच्या सहा पंचांना कारणे दाखवा नोटीस

Margao Municipality: मडगाव 14 व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून 85 लाख रुपयांचे साहित्य विकत घेताना निधीचा गैरवापर केल्याची तक्रार झालेल्या रायचे माजी सरपंच ज्युडास क्वाद्रूस यांच्यासह एकूण सहा पंचांच्या विरोधात पंचायत संचालनालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दैनिक गोमन्तक

Margao Municipality: मडगाव 14 व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून 85 लाख रुपयांचे साहित्य विकत घेताना निधीचा गैरवापर केल्याची तक्रार झालेल्या रायचे माजी सरपंच ज्युडास क्वाद्रूस यांच्यासह एकूण सहा पंचांच्या विरोधात पंचायत संचालनालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या पंचांमध्ये ज्युडास क्वाद्रूस यांच्यासह गॉडफ्री डिसोझा, जासिंता डायस, मारियो डिसोझा, सिंथिया फर्नांडिस आणि त्रिफोनिओ कार्दोस यांचा समावेश आहे.

पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी ही नोटीस बजावली असून या पंचांच्या विरोधात पंचायत कायद्याच्या कलम ५० (अ) आणि (५) नुसार कारवाई का करू नये याचे स्पष्टीकरण सात दिवसांत द्यावे, असे कळविण्यात आले आहे.

सात दिवसांत नोटिसीला उत्तर न दिल्यास तुम्हाला हे आरोप मान्य आहेत, असे समजून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

या निधीच्या खर्चासंदर्भात काही पंच सदस्यांनीच तक्रार केली होती. 19 एप्रिल 2013 रोजी पंचायत संचालकांकडे ही तक्रार नोंदविली होती.

यासंदर्भात दक्षिण गोवा पंचायत उपसंचालकांनी दिलेल्या अहवालात हा निधी खर्च करताना योग्य त्या पद्धतीचे पालन करण्यात आले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT