Kadamba Transport: गावागावांत ‘कदंब’ पोहोचविण्यास कटिबद्ध; वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो

Transport Minister Mavin Gudinho: भविष्यात सर्वसामान्यांना सरकारकडून मिळणार चांगली सेवा
Mavin Gudinho
Mavin Gudinho Dainik Gomantak

Transport Minister Mavin Gudinho: राज्यातील प्रत्येक गावात कदंबची बससेवा पोहोचविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. विजयादशमी दिवशी कदंब महामंडळाने आणखी बससेवेत वाढ केली आहे.

त्‍यामुळे भविष्यात सर्वसामान्यांना सरकारतर्फे आणखी चांगली सेवा मिळेल, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

Mavin Gudinho
Banstarim Accident Case: ‘एफएसएल’ अहवालामुळे आरोपपत्रास होतोय विलंब

दाबोळी-वाडे येथे राष्ट्रीय मार्गाच्या बाजूस ‘आयन मॅटल कॉ.’तर्फे व्यावसायिक सामाजिक जबाबदारी ओळखून बसथांबा उभारण्यात आला आहे. त्‍याचे लोकार्पण विजयादशमीला मंत्री गुदिन्हो यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी चिखली सरपंच कमलाप्रसाद यादव, उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, दाबोळी भाजप गटाध्यक्ष संदीप सूद, मुरगावचे माजी उपनगराध्यक्ष सुदेश कोलगावकर, कायतान परेरा, राहुल केणी, सोनल तळर्णकर, प्रकाश गावस व नागरिक उपस्थित होते.

वाडे-वास्‍को येथे बसथांब्‍याची उभारणी केल्याने शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांची चांगली सोय होणार आहे. सरकार कदंब वाहतूक मंडळात खासगी बसेसबरोबर गोवा माईल्सलाही सामावून घेणार आहे. त्‍यामुळे राज्यातील जनतेला चांगली सेवा उपलब्ध होईल.

- माविन गुदिन्‍हो, वाहतूकमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com