Goa casino murder case update Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: कॅसिनोमध्ये थरारक हत्याकांड! सुरक्षा रक्षकाचा खून करणारा हैद्राबादचा 'रावडी शीटर' विमानतळावरून जेरबंद

Hyderabad rowdy sheeter arrested: पणजी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या हैदराबादच्या एका आरोपीला विमानतळावरून अटक केली

Akshata Chhatre

पणजी: राजधानी पणजीतील कॅसिनोमध्ये शुक्रवारी (दि. २९) पहाटे ३:१० च्या सुमारास एक धक्कादायक आणि गंभीर घटना घडली. एका पर्यटकाने सुरक्षा कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एका सुरक्षा रक्षकाला आपला जीव गमवावा लागला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. पणजी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या हैदराबादच्या एका आरोपीला विमानतळावरून अटक केली आहे.

काय घडले पहाटे ३ वाजता?

पोलिसांना पहाटे ३:१० च्या सुमारास कॅसिनो कार्निव्हलमधून मारामारी झाल्याचा फोन आला. कॅसिनोमध्ये आलेल्या एका पर्यटकाने लोखंडी पकड असलेल्या लाकडी दांड्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्याचा उद्देश जीवे ठार मारण्याचा असल्याचे समोर आले आहे.

या हल्ल्यात धीरू शर्मा (वय ३३, रा. सतना, मध्य प्रदेश) या सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात येत असतानाच त्याने वाटेतच अखेरचा श्वास घेतला. याशिवाय, सत्यम (वय २७, रा. शिरोडा, गोवा) नावाच्या दुसऱ्या सुरक्षा रक्षकालाही डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

हैदराबादचा 'रावडी शीटर' जाळ्यात

घटनेची माहिती मिळताच, उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, पणजी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदेश नाईक आणि पणजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या देखरेखीखाली तातडीने एक पथक तयार करण्यात आले. आरोपीला शोधून काढण्यासाठी आणि त्याला अटक करण्यासाठी या पथकाने वेगाने पावले उचलली.

या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल अल्ताफ (वय २५, रा. मिसरी गंज, चारमिनार, हैद्राबाद, तेलंगणा) याला दाबोळी विमानतळाकडे जात असताना पकडण्यात आले. तो अटकेपासून वाचण्यासाठी पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.

धक्कादायक बाब म्हणजे, अब्दुल अल्ताफ हा हैद्राबादमधील मैलारदेवपल्ली पोलीस ठाण्याचा रावडी शीटर असल्याचेही तपासात उघड झाले आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाने भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

Goa Shipyard Dredger Launch: आंतरराष्ट्रीय जहाजबांधणीत गोवा शिपयार्डची झेप; अत्याधुनिक हायब्रीड ड्रेजरचे यशस्वी लॉन्चिंग

High Tide Waterlogging: खाडीच्या पाण्याचा नेवगीनगरला वेढा; महानगरपालिका कायमस्वरूपी उपाय कधी करणार?

Viral Video: होकार मिळताच झाला गेम! समुद्रकिनारी गर्लफ्रेंडला प्रपोज करणं पडलं महागात, महागडी हिऱ्याची अंगठी थेट समुद्रात पडली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT