Miramar beach Gomantak Digital Team
गोवा

Miramar Beach: मिरामार किनाऱ्यावर जाताय मोबाईल बॅटरीचा वापर करा !

हायमास्टखाली अंधार : दुरुस्तीची गरज

गोमन्तक डिजिटल टीम

Miramar Beach: गेली काही दिवसांपासून मिरामार किनाऱ्यावर हायमास्ट दिवा पेटेना झाला आहे. त्यामुळे किनाऱ्यावर सायंकाळी गेल्यानंतर परतताना पर्यटकांनी मोबाईल बॅटरीचा वापर करावा, असेच आता सूचवावेसे वाटत आहे.

एका बाजूला ‘जी-२०’च्या कामामुळे शहरात विविध कामे सुरू आहे. बांदोडकर मार्गाच्या बाजूचे बंद असलेले दिवे बदलले जात आहेत. काही ठिकाणी नव्याने खांब टाकण्यात आले आहेत.

त्याशिवाय पणजीतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण जोमात सुरू आहे, तर इमारतींनाही रंगरंगोटी केली जात आहे. असे असताना दररोज हजारोंच्या संख्येने ज्या मिरामार किनाऱ्यावर पर्यटक येतात, त्यांना आता अंधारात मार्ग शोधावा लागत आहेत.

तेथे हायमास्ट आहे, पण पेटत नाही असा प्रकार आहे. किनाऱ्यावर सायंकाळच्यावेळी शहर व परिसरातील नागरिकही मुलांना घेऊन येत असतात. किनाऱ्यावर तास-दीड तास सायंकाळी घालविल्यानंतर लोक परतात. येथील हायमास्टचा प्रकाश किनाऱ्यावर दूरपर्यंत पडतो.

परंतु रविवारी किनाऱ्यावर गेलेल्या लोकांना मोबाईल बॅटरीचा वापर करावा लागला. त्यामुळे जोपर्यंत दिव्याची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत किनाऱ्यावर संध्याकाळी जाणाऱ्यांनी मोबाईल बॅटरीचा वापर करावा, असेच आता सूचवावेसे वाटत आहे.

किनाऱ्याची स्वच्छतेची जबाबदारी पर्यटन खात्याकडे आहे. त्यामुळे महापालिकाही त्यात हस्तक्षेप करीत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT