Mirabag Savarde Dainik Gomatnak
गोवा

Mirabag: ‘बंधारा रद्द’चे पत्र द्या, अन्यथा ‘चलो आझाद मैदान’! मीराबाग आंदोलकांचा इशारा; सरकारला 2 दिवसांची मुदत

Mirabag Protest: प्रदीप काकोडकर म्हणाले,की गेल्या पंचेचाळीस दिवसात सरकारचा एकही प्रतिनिधी येऊन ग्रामस्थांना भेटू शकत नाही हे दुर्दैवी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे: मीराबाग बंधारा धरणे आंदोलनाला ४५ दिवस पूर्ण झाले असून जोपर्यंत सरकार लेखी स्वरूपात बंधारा स्क्रॅप केल्याचे पत्र देत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असून सरकारने अनेकदा दोन दिवसांची मुदत मागून पाहिली, पण त्यात काहीही निष्पन्न न होता केवळ तोंडी आश्वासने देण्यात आली.

आता लेखी स्वरूपात पत्र दिल्याशिवाय आंदोलन माघे घेतले जाणार नाही. अन्यथा सोमवारी ‘आझाद मैदान’ येथे जाऊन आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा संकेत भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी माजी मंत्री दीपक पावसकर, प्रदीप काकोडकर, उपेंद्र नाईक, आपा नाईक, सुप्रज तारी, संतोष गावकर, ओलांसिओ सिमोईश व इतर जण उपस्थित होते.

प्रदीप काकोडकर म्हणाले,की गेल्या पंचेचाळीस दिवसात सरकारचा एकही प्रतिनिधी येऊन ग्रामस्थांना भेटू शकत नाही हे दुर्दैवी आहे. सरकारला केवळ चारशे कोटी रुपये दिसत असल्याचा आरोप करून दोन दिवसात बंधारा रद्द केल्याचे लेखी पत्र देऊन लोकांना तीव्र आंदोलन करण्यास मजबूर करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपेंद्र नाईक, आपा नाईक, विश्वानाथ नार्वेकर,रुपेश बाबा, संतोष गावकर आधीनी आपले विचार व्यक्त करून लेखी स्वरूपात पत्र न दिल्यास आंदोलन तीव्र करण्यास सरकार भाग पाडेल असा इशारा दिला.

मंत्री पाणीटंचाईची भीती दाखवतात!

माजी मंत्री दीपक पावसकर म्हणाले आमदार, मंत्री सांगत होते की, लोकांना नको असल्यास सरकारलाही प्रकल्प नको. पण हेच सरकार गेली पंचेचाळीस दिवस लोकांना रस्त्यावर सोडून त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. पाणी पुरवठा मंत्री पाण्याचा तुटवडा असल्याची भीती दाखवितात, त्यांनी धरणातील गाळ उपसून पाण्याचा साठा वाढविण्याचे सोडून बंधारा बांधण्याचे नाटक करू नये, असा इशाराही पावसकर यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: नाकर्ते वीज खाते

Goa Politics: तुम्हीच वेळ ठरवून बैठकीला हजर रहा! परब यांचे नमते, वीरेशना संयत आवाहन

Goa Monsoon Preparedness: 9 मिनिटांत आपत्काल मदत! मुख्यमंत्र्यांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा, 172 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Viral News: चहा-कॉफी नाही, ही तरुणी रोज सकाळी उठून पिते 'पेट्रोल'; कारण ऐकून डॉक्टरही चक्रावले!

Goa Politics: 'आप'चे गोवा सहप्रभारी सिंगला 'ईडी'कडून अटक; मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीसह गोव्यात झडती, अनेक आरोप

SCROLL FOR NEXT