Goa News Dainik Gomantak
गोवा

विहिरीत पडलेल्या अल्पवयीन मुलीला जीवदान

45 फूट खोल विहीर : धुळेर येथील घटना; म्हापसा अग्निशमन दलाचे उल्लेखनीय कार्य

दैनिक गोमन्तक

45 फूट खोल तसेच 20 फूट पाण्याने भरलेल्या विहिरीत पडलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला म्हापसा अग्निशमन दलाने शनिवारी (ता.२६) सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. ही मुलगी मूळची उत्तर प्रदेशमधील असून ती धुळेरमध्ये आपल्या आईवडिलांसोबत भाड्याच्या खोलीत राहते.

म्हापसा अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (ता.२६) सायंकाळी ५.१५ वा.च्या सुमारास घडली. धुळेर येथे गोवा बागायतदारजवळील एका घरामागील विहिरीत मुलगी पडल्याची माहिती शेजाऱ्यांनी पणजी अग्निशमन कंट्रोल रुमला दिली. तेथून म्हापसा अग्निशमन दलास कळविण्यात आले.

त्यानुसार, दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी विहिरीत पडलेल्या मुलीला लाईफ जॅकेट व दोरखंड टाकला. त्यापूर्वी ही मुलगी विहिरीत बाजूला असलेल्या कोपऱ्यामध्ये उभी राहिली होती.

ही मुलगी विहिरीत नक्की कशी पडली हे समजू शकले नाही. विशेष म्हणजे या विहिराला कठडा आहे.

तातडीने बचावकार्य : म्हापसा अग्निशमन दलाचे प्रमुख श्रीकृष्ण पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, फायर फायटर प्रवीण गावकर यांनी या २० फूट पाण्याने भरलेल्या या विहिरीत उतरून या मुलीला सेफ्टी बेल्ट घातला. त्यानंतर, इतर जवानांनी त्या मुलीस ओढून विहिरीबाहेर काढून तिला प्रथमोपचार दिला. या बचावकार्यात सबऑफिसर ज्ञानेश्वर सावंत, विश्वनाथ कोरगावकर, विष्णू गावस, नितीन चोडणकर, भिकाजी काळोजी, साईदत्त आरोलकर, चंद्रकांत नाईक यांनी भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: तांबोशे झाले आता उगवे! 'ओंकार'मुळे शेतकरी त्रस्त; भातशेती, केळी, पोफळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Goa Politics: '2027 मध्ये भाजपचे 27 आमदार येणारच'! मुख्यमंत्र्यांचा ठाम विश्वास; तेंडुलकरांचे केले कौतुक

Goa Tourist: हुर्रे! 6 महिन्यांत 5.45 लाख पर्यटक; नव्या फ्लाईट्स, क्रूझमुळे फुलले पर्यटन

Goa Live Updates: कोलव्यात क्लिनिकला आग

Goa Tourism: बाईक रेंट कमी, शॅक उभारणी! गोव्‍यासमोर महाराष्‍ट्र, कर्नाटकचे आव्‍हान; पर्यटनक्षेत्रात वाढली स्पर्धा

SCROLL FOR NEXT