Rape on Minor in Sanquelim Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Crime Case: साखळीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिच्याकडील मोबाईलची मोडतोड; 22 वर्षीय युवक पोलिसांच्या ताब्यात

Sanquelim Crime Case: मागील काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे

Kavya Powar

Rape on Minor in Sanquelim: मागील काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

यामध्ये प्रामुख्याने ओळखीतल्याच माणसांचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची खळबळजनक घटना साखळी परिसरात घडली आहे.

याप्रकरणी डिचोली पोलिसांनी स्वप्निल माशेलकर (22) या संशयित युवकाला अटक केली असून, तो सत्तरी तालुक्यातील पर्ये गावातील असल्याची माहिती मिळाली आहे. पीडित मुलीच्या आईने संशयिताविरोधात डिचोली पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

संशयिताने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करतानाच तिच्याकडील मोबाईलचीही मोडतोड केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पॉस्को कायद्याखाली गुन्हा नोंद करुन संशयिताला अटक केली आहे.

डिचोलीचे पोलिस निरीक्षक राहूल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विकेश हडफडकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT