Minor girl Assault Dainik Gomantak
गोवा

Minor girl Assault: सात दिवसांत घर खाली करण्‍याची संशयित बक्षीच्‍या कुटुंबाला नोटीस, पर्वरी बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणात पंचायतीचा निर्णय

Porvorim Minor girl Assault: पर्वरीतील एका सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अल्लाबक्ष सय्यदाबादे ऊर्फ बक्षी (४६) याच्‍या घरावर बुधवारी स्थानिक पंचायतीने नोटीस चिकटवली.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा : पर्वरीतील एका सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अल्लाबक्ष सय्यदाबादे ऊर्फ बक्षी (४६) याच्‍या घरावर बुधवारी स्थानिक पंचायतीने नोटीस चिकटवली. या नोटिशीनुसार, त्‍या कुटुंबाला सात दिवसांत घर खाली करावे लागणार आहे. दरम्‍यान, तत्‍पूर्वीच संशयिताच्‍या पत्‍नीने आपल्‍या १६ वर्षीय मुलीला घेऊन नातेवाईकांचे घर गाठले आहे.

मुलांना शाळेत ने-आण करणाऱ्या व्‍हॅनवर अल्लाबक्ष सय्यदाबादे हा चालक म्‍हणून काम करतो. पर्वरी पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे. हा किळसवाणा प्रकार उघडकीस आल्यानंतर काल मंगळवारी रात्री स्थानिकांनी संशयिताच्या घराबाहेर जमाव केला. तसेच त्‍याच्‍या कुटुंबाला गावात राहण्यास तीव्र आक्षेप घेतला.

वातावरण स्‍फोटक बनले. याची दखल घेऊन स्‍थानिक पंचायतीने संशयिताच्‍या घरावर नोटीस चिकटवली. त्‍यानुसार ‘२० कलमी कार्यक्रम’ परिसरातील या कुटुंबाला सात दिवसांत घर खाली करावे लागणार आहे.सध्या संशयित अल्लाबक्ष सय्यदाबादे हा चार दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे.

अन्‍यथा कठोर कारवाई

पंचायतीने नोटिशीत म्हटले आहे की, या प्रकरणी पंचायतीला स्थानिकांकडून तक्रार प्राप्त झाली आहे. त्‍यामुळे सामान्य जनतेमध्ये भीती, अशांतता व असुरक्षितता निर्माण झाली आहे.

म्हणूनच तुमच्या निवासस्थानाच्या परिसरात कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तुम्हाला परिसर खाली करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. ही नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत हा परिसर खाली करावा लागेल अन्यथा तुमच्या कुटुंबाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

SCROLL FOR NEXT