subhash phaldesai meet aamir khan Dainik Gomantak
गोवा

मंत्री फळदेसाईंनी घेतली आमिर खानची भेट, आगामी Purple Festival आणि सामाजिक उपक्रमांवर केली चर्चा

subhash phaldesai meet aamir khan: समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज (२० सप्टेंबर) प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांची भेट घेतली.

Sameer Amunekar

पणजी : समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज (२० सप्टेंबर) प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी गोव्यात होणाऱ्या आगामी पर्पल फेस्ट तसेच अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी सुरु असलेल्या विविध उपक्रमांवर चर्चा केली.

मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, “भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे आमिर खान यांनी त्यांच्या असाधारण अभिनय आणि चित्रपटांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. लगान, तारे जमीन पर, दंगल यांसारख्या चित्रपटांनी केवळ मनोरंजनच केले नाही तर लोकांच्या मनावर खोलवर परिणाम करून सामाजिक जागरूकतेचा संदेशही दिला आहे.”

फळदेसाई पुढे म्हणाले की, "आमिर खान यांचा सामाजिक बांधिलकीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पर्पल फेस्टसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्पल फेस्ट हा अपंग व्यक्तींच्या जीवनात आत्मविश्वास, संधी आणि सक्षम समाजाची निर्मिती करण्यासाठी एक मोठा मंच ठरला आहे. अशा उपक्रमांना आमिर खान यांसारख्या दिग्गज व्यक्तींचा पाठिंबा असल्यानं अधिक बळ मिळालं आहे.”

दरम्यान, गोव्यातील पर्पल फेस्ट ही राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा महोत्सव बनला आहे. या उत्सवामध्ये अपंग व्यक्तींच्या कला, कौशल्य, आणि विविध उपक्रमांचे प्रदर्शन होणार आहे. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना सहभागी करून घेत, “समावेशक भारत” घडविण्यासाठी हा उत्सव एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT